मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NCP : हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीचे छापे; राष्ट्रवादीनं जोडला मोहन भागवतांच्या विधानाशी संबंध

NCP : हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीचे छापे; राष्ट्रवादीनं जोडला मोहन भागवतांच्या विधानाशी संबंध

Jan 11, 2023, 02:47 PM IST

  • NCP Reaction on Hasan Mushrif  Raid : हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाईचा निषेध करताना राष्ट्रवादीनं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा दाखला दिला आहे.

Mohan Bhagwat - Hasan Mushrif

NCP Reaction on Hasan Mushrif Raid : हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाईचा निषेध करताना राष्ट्रवादीनं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा दाखला दिला आहे.

  • NCP Reaction on Hasan Mushrif  Raid : हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाईचा निषेध करताना राष्ट्रवादीनं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा दाखला दिला आहे.

NCP on ED raids on Hasan Mushrif : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या पुणे, कोल्हापूर येथील घरी व कारखान्यांवर सक्तवसुली संचालनालयानं (ED) छापे टाकले आहेत. त्यामुळं राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. हसन मुश्रीफ यांनी या कारवाईवर आश्चर्य व्यक्त केलं असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसनं या कारवाईचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांच्या वक्तव्याशी जोडत ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

Manoj jarange patil : अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

संघाचे मुखपत्र 'पांचजन्य'ला दिलेल्या एका मुलाखतीत मोहन भागवत यांनी अलीकडंच मुस्लिम समुदायाला उद्देशून अनेक मुद्दे मांडले आहेत. 'हिंदू आणि मुस्लिम वेगवेगळे असून दोन्ही एकत्र राहू शकत नाहीत, हा विचार मुस्लिमांना सोडावा लागेल. भारताला हिंदुस्तानच म्हटलं गेलं पाहिजे आणि या देशात मुस्लिमांना घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, असं भागवत यांनी म्हटलं आहे. याच वक्तव्याचा उल्लेख करत राष्ट्रवादीनं मुश्रीफ यांच्यावरील कारवाईवर भूमिका मांडली आहे.

'भारतातील मुस्लिमांना घाबरण्याचं कारण नाही असं मोहन भागवत म्हणतात आणि त्यानंतर अवघ्या २४ तासांतच हसन मुश्रीफ यांच्या घरावर कारवाई होते, हे आश्चर्यकारक आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे. 'भाजप सातत्यानं केंद्र सरकारी यंत्रणांचा वापर करत आहे. महाविकास आघाडी कमकुवत करण्यासाठी आणि नेत्यांना भाजपकडं खेचण्यासाठी हे सगळं सुरू आहे. भाजपचे काही नेते ईडीच्या संभाव्य छाप्यांबाबत माध्यमातून वक्तव्य करतात आणि पुढं तसंच घडतं याचा अर्थ काय?, असा सवाल महेश तपासे यांनी केला. शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठीशी असलेल्या आमदार व खासदारांवरील सर्व आरोपांचं काय झालं? भाजपनं या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ईडी, आयटीनं तपास बंद करून त्यांना निर्दोष सोडलं आहे का?, असा सवालही तपासे यांनी केला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या