मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC Result 2021: एमपीएससी राज्यसेवा परीक्षा निकाल जाहीर, प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात अव्वल

MPSC Result 2021: एमपीएससी राज्यसेवा परीक्षा निकाल जाहीर, प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात अव्वल

Feb 28, 2023, 09:20 PM IST

  • MPSC Results 2021 : एमपीएससी राज्यसेवा २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना पदांसाठी पसंतीक्रम देण्यासाठी ३ ते १० मार्च दरम्यान वेबलिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा  निकाल जाहीर

MPSC Results 2021 : एमपीएससी राज्यसेवा २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना पदांसाठी पसंतीक्रम देण्यासाठी ३ ते १० मार्च दरम्यान वेबलिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • MPSC Results 2021 : एमपीएससी राज्यसेवा २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना पदांसाठी पसंतीक्रम देण्यासाठी ३ ते १० मार्च दरम्यान वेबलिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

maharashtra public service commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.यापरीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून या परीक्षेत प्रमोद चौगुले यांनी राज्यात सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे. शुभम पाटील याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. महिला गटात सोनाली मात्रे यांनी पहिला क्रमांक मिळवला.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

प्रमोद चौगुले यांनी सलग दुसऱ्यांदा पाहिला क्रमांक मिळवला आहे. आता उमेदवारांना ३ मार्च ते १० या कालावधीत पदासाठीचे पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदवता येतील. पसंतीक्रमाच्या आधारे अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.

प्रमोद चौगुले यांनी ६३३ गुणांसह राज्यात पहिला क्रमांक पटकावला तर शुभम पाटीलला ६१६ गुण मिळाले आहेत. शुभम पाटील दुसरा आला आहे. मुलींमध्ये सोनाली मात्रे पहिली आहे, तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत सोनालीला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधिक्षक, तहसीलदार सह एकूण २० पदांच्या ४०५ जागांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या निकालाची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता ३ मार्च २०२३ ते १० मार्च २०२३ या कालावधीत वेब लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे.

आयोगाने ४०५ पदांसाठी ७, ८ व ९ मे २०२२ रोजी मुख्य परीक्षा घेतली होती. सदर परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. प्रमोद चौगुले हा २०२० च्या परीक्षेतही राज्यात प्रथम आला होते, त्यावेळी त्यांची निवड जिल्हा उद्योग अधिकारी या पदी झाली होती.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या