मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC Recruitment Update: एमपीएससीकडून पुन्हा मेगाभरती; राज्य सेवेच्या ६७३ पदांसाठी होणार परीक्षा, २२ मार्च पर्यंत करा अर्ज

MPSC Recruitment Update: एमपीएससीकडून पुन्हा मेगाभरती; राज्य सेवेच्या ६७३ पदांसाठी होणार परीक्षा, २२ मार्च पर्यंत करा अर्ज

Feb 26, 2023, 11:48 AM IST

    • MPSC Recruitment Update : राज्य शासनाने एमपीएससी मार्फत मेगा भरती जाहीर केली आहे. विविध विभागातील तब्बल ६७३ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असून या बाबतची नोटिस राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC Recruitment 2023 (HT)

MPSC Recruitment Update : राज्य शासनाने एमपीएससी मार्फत मेगा भरती जाहीर केली आहे. विविध विभागातील तब्बल ६७३ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असून या बाबतची नोटिस राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

    • MPSC Recruitment Update : राज्य शासनाने एमपीएससी मार्फत मेगा भरती जाहीर केली आहे. विविध विभागातील तब्बल ६७३ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असून या बाबतची नोटिस राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुणे : राज्य शासनाच्या पाच विभागाची भरती प्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगातर्फे लवकरच राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा असून या द्वारे तब्बल पाच विभागातील ६७३ पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीची पूर्व परीक्षा ४ जून रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर होणार आहे. या संदर्भात राज्य लोकसेवा आयोगाने नोटिस काढली असून ट्विटरवर देखील माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

सामान्य प्रशासन विभाग, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये या विभागासाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या परीक्षेसाठी २२ मार्च पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. दरम्यान, पूर्व परीक्षेतील निकालात मेरिटच्या आधारे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे घेतली जाणार आहे. ही परीक्षा ७ ते ९ ऑक्टोबर, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ आणि गट ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर, विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर, निरीक्षक वैधमापनशास्त्र गट ब मुख्य परीक्षा २१ ऑक्टोबर, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा गट ब मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबरला होणार असल्याचे आयोगाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सामान्य प्रशासन विभागामध्ये २९५ पदे, पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभागात १३० पदे, सार्वजनिक बांधकाम विभागात १५ पदे, अन्न व नागरी विभागात ३९ पदे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात १९४ पदांकरिता ही परीक्षा घेतली जाणार आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या