मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; अजित पवारांनी दिले पवार साहेबांना श्रेय

MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; अजित पवारांनी दिले पवार साहेबांना श्रेय

Feb 23, 2023, 08:20 PM IST

  • Ajit Pawar on MPSC : एमपीएससी आयोगानं घेतलेल्या निर्णयामध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबरोबर पवारसाहेबांची भूमिका निर्णायक ठरली आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar - MPSC

Ajit Pawar on MPSC : एमपीएससी आयोगानं घेतलेल्या निर्णयामध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबरोबर पवारसाहेबांची भूमिका निर्णायक ठरली आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

  • Ajit Pawar on MPSC : एमपीएससी आयोगानं घेतलेल्या निर्णयामध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबरोबर पवारसाहेबांची भूमिका निर्णायक ठरली आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar on MPSC Decision : विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढं नमतं घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं नवा अभ्यासक्रम व नवी परीक्षा पद्धती २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर आंदोलक विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही एमपीएससीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. शरद पवार साहेबांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली होती, ती निर्णायक ठरली, असं त्यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरूपात सन २०२५ पासून लागू करण्याचं जाहीर करून विद्यार्थ्यांसमोरचा संभ्रम दूर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं हे यश आहे. त्याबद्दल अजित पवार यांनी 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांचं मन:पूर्वक अभिनंदन केलं आहे. या लढ्यातील पवार साहेबांची भूमिकाही महत्त्वाची ठरली आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नवीन अभ्यासक्रम सन २०२५ पासून सुरू करण्याच्या या निर्णयामुळं उमेदवारांना नवीन स्वरुपातल्या अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. या नवीन स्वरूपाच्या अभ्यासक्रमामुळं राज्य शासनाच्या सेवेत दर्जेदार अधिकारी उपलब्ध होतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. आता विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करून घवघवीत यश मिळवावं, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

आता जोमाने तयारीला लागा - शरद पवार

एमपीएससीच्या निर्णयावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आलं आहे. आता जोमानं तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या