मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : 'मोदी फादर ऑफ करप्शन..' इलेक्टोरल बॉण्डवरून शिवसेनेचा हल्लाबोल

Sanjay Raut : 'मोदी फादर ऑफ करप्शन..' इलेक्टोरल बॉण्डवरून शिवसेनेचा हल्लाबोल

Mar 16, 2024, 11:43 AM IST

    • Sanjay Raut on electoral bonds : इलेक्टोरल बाँडवरून (sanjay Raut) शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra Modi) मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बडे उद्योगपती हे मोदी यांच्या परिवार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
'मोदी फादर ऑफ करप्शन..' इलेक्टोरल बॉण्डवरून शिवसेनेचा हल्लाबोल

Sanjay Raut on electoral bonds : इलेक्टोरल बाँडवरून (sanjay Raut) शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra Modi) मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बडे उद्योगपती हे मोदी यांच्या परिवार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

    • Sanjay Raut on electoral bonds : इलेक्टोरल बाँडवरून (sanjay Raut) शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra Modi) मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बडे उद्योगपती हे मोदी यांच्या परिवार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Sanjay Raut on electoral bonds : इलेक्टोरल बाँडवरून विरोधक आक्रमक झाले आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात माहिती जाहीर केल्यावर सर्वाधिक इलेक्टोरल बाँड हे भाजपचे घेतल्याचे यात उघड झाले असून ज्यांनी हे बॉन्ड घेतले आहेत, त्या कंपन्यांची यादी जाहीर झाली आहे. यावरून आता विरोधकांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. काल राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यानंतर आज शिवसेनेने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला केला आहे. खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी फार करप्शन म्हणत बडे उद्योगपती हे मोदी यांच्या परिवार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Madras High Court : आम्ही डोळ्यांवर पट्टी बांधलेली नाही! न्यायाधीशांनी युट्यूबरला फटकारले; ५० लाखांचा ठोठावला दंड

सर्वोच न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक रोख्यांविषयीची सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली. निवडणूक आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावरून जाहीर केलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीच्या नावे ८,६३३ नोंदी आहेत. भाजपाला ८,६३३ निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. यावरून विरोधकांनी भाजपवर हल्ला बोल केला आहे. खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे.

Asim Sarode : शिंदे गटातील 'हे' आमदार उद्धव ठाकरेंची साथ देण्यास तयार! अ‍ॅड. असीम सरोदे यांनी थेट नावंच सांगितली!

राऊत म्हणाले, इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून भाजपला ज्यांनी निधी दिला त्या कंपन्या म्हणजे मोदी यांचा परिवार आहे. आम्ही गरीब माणसं त्यांचा परिवार नाही. औषधनिर्माण कंपनी, ठेकेदार, कंत्राटदार हा भाजपचा मोठा परिवार आहे. आणि त्यांच्यासाठीच भाजप काम करतं. जेव्हा नवीन सरकार येईल तेव्हाच गरिबांचे कल्याण होईल असे देखील संजय राऊत म्हणाले.

Pimpri chinchwad Crime : पिंपरी-चिंचवडमध्ये टोळक्याने केली २० ते २५ वाहनांची तोडफोड; हातात कोयते घेऊन माजवली दहशत

महावीकास आघाडीच्या जागा वाटपावरून राऊत म्हणाले, महावीकास आघाडीच्या नेत्यांची काल बैठक झाली. यात मोठे नेते होते. वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष आहे. आम्ही त्यांना ४ जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी आम्हाला २७ जागांची यादी दिली होती. त्यांना आम्ही विनंती केली आहे की त्यांनी या चार जागा लढवाव्या. आता त्यांनी आम्हाला या बाबत निर्णय कळवावे की त्यांना हा प्रस्ताव मान्य आहे की नाही. आमचे दरवाजे उघडे आहेत.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत येत असून या यात्रेत महाविकास आघाडीचे नेते सोबट असतील असे देखील राऊत म्हणाले.

पुढील बातम्या