Pimpri chinchwad Crime : पिंपरी-चिंचवडमध्ये टोळक्याने केली २० ते २५ वाहनांची तोडफोड; हातात कोयते घेऊन माजवली दहशत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pimpri chinchwad Crime : पिंपरी-चिंचवडमध्ये टोळक्याने केली २० ते २५ वाहनांची तोडफोड; हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Pimpri chinchwad Crime : पिंपरी-चिंचवडमध्ये टोळक्याने केली २० ते २५ वाहनांची तोडफोड; हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Updated Mar 16, 2024 10:09 AM IST

Pimpri-chinchwad Crime : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. पिंपरी-चिंचवडच्या बिजलीनगर येथे२० ते २५ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये टोळक्याने केली २० ते २५ वाहनांची तोडफोड
पिंपरी-चिंचवडमध्ये टोळक्याने केली २० ते २५ वाहनांची तोडफोड

Pimpri-chinchwad Crime : पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा वाहन तोडफोडीच्या घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास तब्बल १० ते १५ जणांच्या टोळक्याने येथेल बीजलीनगरमध्ये २० ते २५ वाहनांची तोडफोड केली. ऐवढेच नाही तर काही तरुणांनी हातात कोयते घेऊन हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक दहशतीत असून घाबरले आहेत.

election commission : आचारसंहिता म्हणजे काय ? काय सुरू राहणार आणि काय राहणार बंद? वाचा

पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीने तोंड उघडले आहे. पुण्याची सांस्कृतिक आणि विद्येचे माहेरघर ही ओळख आता पुसू लागली आहे. पुण्यात विश्रांतवाडी येथे देखील काही टोळक्याने वाहनांची तोडफोड केली होती. तर हडपसर येथे देखील हातात कोयते घेऊन वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या घटना ताज्या असतांना आता पिंपरी-चिंचवडमध्ये या प्रकारच्या घटना या नित्याच्याच होऊ लागल्या आहेत. केवळ दहशत माजवण्यासाठी काही तरुणांचे टोळके हातात, तलवारी कोयते घेऊन वाहनांची तोडफोड करून दहशत माजवून सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान करत आहेत.

Maharashtra Weather Update: भर उन्हाळ्यात छत्र्या बाहेर काढा! विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचे; 'या' जिल्ह्यांना अलर्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास पिंपरी चिंचवडमध्ये बीजलीनगरमध्ये दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. भर रस्त्यात हातात कोयते हवेत नाचवत या टोळक्याने धुडगूस घातला. यात २० ते २५ वाहनांचे यात नुकसान झाले. टोळक्याने दशहत माजवण्यासाठी हा प्रकार केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आरोपींना लवकरच अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन पोलिसांनी परिसरातील नागरिकांना दिले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर