मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray Speech: शिवसेनेचं प्रमुखपद ते भाजपकडून ‘कमळ’चा प्रस्ताव, राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray Speech: शिवसेनेचं प्रमुखपद ते भाजपकडून ‘कमळ’चा प्रस्ताव, राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

Apr 09, 2024, 11:44 PM IST

  • Raj Thackeray Speech : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी अनेक खुलासे केले. भाजपने त्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला होता. तसेच २००६ मध्ये शिवसेनेचे ३२ आमदार व ६ ते ७ खासदार सोबत असल्याचा गौप्यस्फोट ठाकरेंनी केला आहे.

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray Speech : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी अनेक खुलासे केले. भाजपने त्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला होता. तसेच २००६ मध्ये शिवसेनेचे ३२ आमदार व ६ ते ७ खासदार सोबत असल्याचा गौप्यस्फोट ठाकरेंनी केला आहे.

  • Raj Thackeray Speech : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी अनेक खुलासे केले. भाजपने त्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला होता. तसेच २००६ मध्ये शिवसेनेचे ३२ आमदार व ६ ते ७ खासदार सोबत असल्याचा गौप्यस्फोट ठाकरेंनी केला आहे.

Raj Thackeray Speech : मनसेचा गुढीपाडवा आज शिवतीर्थावर पार पडला. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी अनेक खुलासे केले. राज ठाकरेंनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या भेटीतील चर्चेबाबत देखील खुलासा केला. राज ठाकरे म्हणाले की, जागा वाटपाची चर्चा झाली. मी शेवटच्या जागा वाटपाच्या चर्चेला १९९५ ला बसलो. त्यानंतर मी कधी चर्चेला बसलो नाही. 

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

मला कमळ चिन्हावर लढण्यास सांगितलं मात्र हे रेल्वे इंजिन आहे ना हे तुमच्या कष्टाने कमावलेलं चिन्ह आहे. माझ्याकडे आयतं आलेलं नाही. सहज आलंय म्हणून लढवायचं अजिबात नाही.

शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुखपद राज ठाकरे स्वीकार असल्याच्या चर्चेवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा माझ्या घरी ३२ आमदार आणि ६ ते ७  खासदार जमले होते. आपण एकत्र बाहेर पडू, असे ते म्हणत होते. मात्र, त्यानंतर मी महाराष्ट्र दौरा सुरु केला. अनेकांना वाटलं मी काँग्रेसमध्ये जाईन. पण मी तेव्हाच स्पष्ट केलं होतं की, मला पक्ष फोडून कुठली गोष्ट करायची नाही. माझ्या मनात असा कोणताही विचार नाही. पण जर मी पक्षातून बाहेर पडलो तरी मी स्वत:चा पक्ष काढेन. पण मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही, हे मी तेव्हाच ठरवले होते. तरीही मी त्यावेळी एकाला संधी दिली होती. पण त्याला समजलंच नाही, असा टोलाही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच आता कोणत्याही पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

  • निवडणूक आयोगाने आता आरोग्यसेवकांनाही निवडणुकीच्या कामात जुंपलं आहे, हे चुकीचं आहे. आरोग्यसेवकांनी रुग्णांची सेवा करत रहावी, तुम्हाला निवडणुकीच्या कामात कोण जुंपतं हेच मी पाहतो.
  • अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच चर्चा माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं कि, माझी भूमिका मी योग्यवेळी मांडेन. मग उगीच पाळत ठेवल्यासारखी माध्यमं का वागतात ? माझी भूमिका मी जाहीर करणारच ना, आणि करावीच लागेल. मी आडपडदा ठेवून, आत एक बाहेर एक असं करणारा नेता नाही.
  • Sudhir Mungantiwar : चंद्रपूरचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
  • काय तर म्हणे राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार... "अरे मूर्खांनो व्हायचं असतं तर २००६ सालीच झालो नसतो का? तेव्हा खासदार-आमदार माझ्या घरी आले होते. ते सर्व बाजूला सारून मी महाराष्ट्र दौरा केला आणि माझा पक्ष उभा केला. कारण मी पक्ष फोडून राजकारण करणाऱ्यातला नाही."
  • तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका... मी जे अपत्य जन्माला घातलं आहे 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' तेच मी वाढवणार, त्याचं संगोपन करणार... मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत.
  • माझ्या चिन्हाच्या बाबतीतही अफवा पेरल्या... 'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे, त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरु राहणार. माझ्या पक्षाच्या चिन्हावर कोणतीही तडजोड करणार नाही. कोणत्याही तर्क-वितर्कांवर विश्वास ठेवून नका.
  • एक गोष्ट स्पष्टच सांगतो... एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे हे पाहत नाही रोखठोक भूमिका घेत आलो आहे, घेत राहीन. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो... आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो.
  • म्हणे 'ठाकरे' कधीच दिल्लीत गेले नाहीत. काहीजणांना राजकीय इतिहासचं माहित नसतो... स्व. बाळासाहेब १९८० साली दिल्लीत संजय गांधी आणि इंदिरा गांधी ह्यांना भेटायला गेले होते. नेत्यांना भेटणं, चर्चा करणं... ह्यात वावगं काय ?
  • मी अमित शहांना भेटल्यानंतर... २०१९ च्या 'लाव रे तो व्हिडीओ' लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सतत दाखला दिला जातो. २०१४ ची निवडणुकीआधी मोदी पंतप्रधान नव्हते ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. मी गुजरात पाहिलं आणि तिथल्या पत्रकारांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्र अजूनही गुजरातच्या पुढे आहे. पण तेव्हा जे वातावरण उभं झालं होतं त्यात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदासाठी आश्वासक वाटत होते. म्हणून ते पंतप्रधान व्हावेत असं म्हणणारा देशातील पहिला राजकीय नेता मीच होतो. त्याप्रमाणे देशानेही कौल दिला. 
  • नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांच्या राज्यकारभारात ज्या त्रुटी आढळल्या त्याकडे दुर्लक्ष केलं नाही त्यावरही सडकून टीका केली. पण जेव्हा ३७० कलम हटवलं गेलं तेव्हा अभिनंदनाचा ट्विटही सर्वप्राथच मीच केलं... ह्या भूमिका नीट समजून घ्यायला हव्यात.
  • आज उद्धव ठाकरे , संजय राऊत नरेंद्र मोदींवर टीका करतात. कारण काय तर मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून. पण मी जो विरोध केला तो काही भूमिका पटल्या नाहीत म्हणून विरोध केला, मला काही वैयक्तिक मिळालं नाही म्हणून नाही. मग उद्धव ठाकरे , संजय राऊतांना मोदींच्या भूमिका अजिबात पटत नव्हत्या तर राजीनामे खिशात न ठेवता तेव्हाच माझ्याबरोबर मैदानात का नाही उतरलात. तेव्हा सत्तेचा मलिदा खात राहिलात.
  • माझी नरेंद्र मोदींकडे अपेक्षा आहे कि, भारतीय तरुणाईकडे लक्ष द्या. त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा समजून घ्या... तसं उमदं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन द्या. 
  • जगातला सर्वात तरुण देश आपला भारत देश आहे. पण आपला देश भलत्याच मुद्द्यांमध्ये भरकटला तर मात्र ह्या देशात अराजक येईल.
  • आज निवडणुकीच्या जागावाटपाची जी हाणामारी सुरु आहे ती पाहता विधानसभेला सर्व पक्ष कोथळाच काढतील एकमेकांचा. ह्यासाठी निवडणुका असतात का?
  • मतदारांनो माझं तुम्हाला आवाहन आहे कि, "राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. अन्यथा चुकीचा पायंडा पडेल."
  • माझा माझ्या सहकाऱ्यांवर, त्यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास आहे. सर्वसामान्य घरातून येणाऱ्या ह्याच सहकाऱ्यांना घेऊन मला महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचं आहे. 
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे... आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे. 

माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, उत्तम संघटना बांधणी करा, मतदारसंघ बांधा. मागे-पुढे पाहू नका आणि तुम्ही विधानसभेच्या जोरदार तयारीला लागा.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या