मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sudhir Mungantiwar : चंद्रपूरचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 09, 2024 08:07 PM IST

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन केले असून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करावी,अशी मागणी प्रदेश काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे (Election Commission) केली आहे.

सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई – राज्यातील मंत्री व भारतीय जनता पाट्रीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir  mungantiwar) यांनी चंद्रपूरमधील पंतप्रधान मोदींच्या सभेत बोलताना सर्व मर्यादा पार केल्या. त्यांची भाषा चिथवणीखोर व दोन समाजात शत्रुत्व निर्माण करणारी आहे. मुनगंटीवारांनी आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन केले असून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणुक आयोगाकडे (Election Commission) केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्य निवडणुक अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत अतुल लोंढे यांनी म्हटले की, सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना उद्देशून प्रक्षोभक भाषा वापरत अपमानजनक टिप्पणी केली. समाजात द्वेष आणि मतभेद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मुनगंटीवार यांचे भाषण केवळ आक्षेपार्हच नसून समाजात विषाचे बीज पेरणारे आहे. मुनगंटीवार यांनी भाषणात महिलांबद्दलही अपमानजनक विधाने करुन महिलांची (brother sister relationship) बदनामी केली आहे.

काँग्रेसने म्हटले आहे की, मुनगंटीवार यांनी चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला हा प्रकार लोकशाही प्रक्रियेला खीळ घालणारा व मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. त्यांची कृती केवळ आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन करणारी नसून लोकशाहीच्या नियमांची पायमल्ली करणारी आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी रद्द करावी, त्यांच्यावर आणि भाजपवर निवडणूका लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर येण्यापूर्वी मुनगंटीवारांनी भाषण केले होते. काँग्रेसवर टीका करताना मुनगंटीवार यांनी असभ्य भाषेचा वापर केला. भाषणादरम्यान मुनगंटीवार यांनी बहीण-भावाच्या नात्याबाबत असभ्य भाषा वापरली. मुनगंटीवारांनी काँग्रेसवर टीका करताना भाऊ-बहिणींना गळफास लावणारा आणि एकाच बेडवर भाऊ-बहिणींना विवस्त्र झोपवणारा पक्ष असे वर्णन केले. मुनगंटीवार यांचे भाषण ऐकून उपस्थित श्रोतेही अवाक् झाले.

IPL_Entry_Point

विभाग