मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : पोलिसांना सगळं माहीत असतं, पण ऑर्डर्स नसतात; घोसाळकर हत्येनंतर राज ठाकरे यांचा व्हिडिओ व्हायरल

Raj Thackeray : पोलिसांना सगळं माहीत असतं, पण ऑर्डर्स नसतात; घोसाळकर हत्येनंतर राज ठाकरे यांचा व्हिडिओ व्हायरल

Feb 09, 2024, 11:07 AM IST

  • MNS Shares Raj Thackeray Video on law and order : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर मनसेनं राज ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे.

Raj Thackeray on Law and order (PTI)

MNS Shares Raj Thackeray Video on law and order : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर मनसेनं राज ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे.

  • MNS Shares Raj Thackeray Video on law and order : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर मनसेनं राज ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे.

Raj Thackeray Video Viral : मुंबईतील बोरिवली इथं माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गुंडानं गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. विरोधकांसह जनसामान्यांकडूनही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेनं सोशल मीडियावर राज ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

राज ठाकरे यांच्या एका मुलाखतीचा हा व्हिडिओ आहे. त्यात ते कायदा सुव्यवस्थेवर बोलत आहेत. 'आपल्या देशात कायदे आहेत. लॉ आहे, ऑर्डर नाहीत. त्या ऑर्डरची गरज आहे. ठरवलं तर सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात. माझा मुंबई पोलिसांवर, महाराष्ट्र पोलिसांवर शंभर टक्के विश्वास आहे. पोलिसांना ४८ तास द्या, त्यांना सांगा महाराष्ट्र साफ करून द्या. सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असतात, पण ऑर्डर नसतात. रिस्क कोण घेणार?, असा प्रश्न त्यांनी केला.

‘पोलिसांनी समजा एखादी भूमिका घेतली तर त्यांना जेलमध्ये जायला लागत असेल तर ते का करतील? कोणसाठी जातील? वर बसलेला माणूसच टेम्पररी आहे. त्याच्यासाठी त्यांनी पर्मनंट जेलमध्ये का जायचं? उत्तम काम करणारे पोलीस अधिकारी आपल्याकडं आहेत. महाराष्ट्र त्या बाबतीत भाग्यवान आहे. फक्त त्यांना ४८ तासांची मोकळीक द्या,’ असं राज ठाकरे बोलताना दिसत आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, मारामाऱ्यांच्या घटना सातत्यानं घडत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात गुंड शरद मोहोळ याची दिवसाढवळ्या हत्या झाली. त्यानंतर कल्याणचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला. त्यानंतर गुरुवारी रात्री (८ फेब्रुवारी २०२४) अभिषेक घोसाळकर यांची एका गुंडानं गोळ्या घालून हत्या केली. या सगळ्या घटनांमुळं सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. राज ठाकरे यांचा हा व्हिडिओ त्यामुळंच व्हायरल होत आहे. त्यांनी या सगळ्या घटनांवर एक प्रकारचा उपाय सांगितला आहे.

‘राज्यातील बेछूट गोळीबार, टोळीयुद्ध, गुन्हेगारांचा मुक्त संचार, कोयता गँगचा उच्छाद, मुलींचं अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या,’ असं मनसेनं हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या