मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Murder: दारू पिण्यास विरोध केल्यानं पत्नीची हत्या, मुंबईच्या कांजूरमार्ग येथील घटना

Mumbai Murder: दारू पिण्यास विरोध केल्यानं पत्नीची हत्या, मुंबईच्या कांजूरमार्ग येथील घटना

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 09, 2024 08:54 AM IST

Man Kills wife In Mumbai: मुंबईच्या कांजूरमार्ग येथे पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.

husband murderd wife
husband murderd wife

Mumbai Kanjur Marg Murder: मुंबईच्या कांजूरमार्ग येथे दारू पिण्यास विरोध केला म्हणून पत्नीची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अट केली आहे. मृत महिला आणि आरोपीची सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि गेल्या सहा महिन्यापूर्वी दोघांनी एकमेकाशी लग्न केले. परंतु, आरोपीला दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत असे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

राजेश यादव असे पत्नीची हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, दीपा यादव (वय, २२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी कांजूर मार्गावरील झोपडपट्टीत दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. नंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडून महिला बेडशीटमध्ये गुंडाळलेली आढळली. महिलेचा मृतदेह सापडला असून तो शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला,जिथे महिलेची हत्या झाल्याची पुष्टी झाली. राजेश गायब असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी राजेशचे लोकेशन ट्रेस करत त्याला उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी राजेशची कसून चौकशी केली असता त्यानेच पत्नीची हत्या केल्याची कबूली दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश आणि मृत महिला दीपा यांची फेसबूकवर भेट झाली होती. यानंतर दोघेही एकमेकांशी बोलू लागले. तिथून दोघांमध्ये नंबरची देवाणघेवाण झाली. या संवादाचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि गेल्या सहा महिन्यापूर्वी दोघांनी लग्न केले. राजेशसोबत लग्न करण्यासाठी दीपा ओरिसातून मुंबईत आली होती. मात्र, राजेशला दारूचे व्यसन असल्याचे तिला माहिती नव्हती. ज्यामुळे दोघांमध्ये दररोज वाद होऊ लागले. काही दिवसांपूर्वी दारु पिण्यावरून पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले. मात्र, यावेळी भांडणानंतर राजेशने दीपाची हत्या केली.

WhatsApp channel

विभाग