मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  वसतीगृहात गेली ती परतलीच नाही; एमबीबीएसला शिकणाऱ्या तरुणीची लातूरमध्ये आत्महत्या

वसतीगृहात गेली ती परतलीच नाही; एमबीबीएसला शिकणाऱ्या तरुणीची लातूरमध्ये आत्महत्या

Jan 18, 2023, 06:15 PM IST

  • Latur Suicide Case : गेल्या काही दिवसांपासून साक्षी तणावाखाली होती. याबाबत तिनं कुणाशीची चर्चा केली नव्हती. कॉलेजमध्ये जाण्यासाठी मुली साक्षीला बोलावण्यासाठी तिच्या खोलीत गेल्या तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.

Suicide Case In Vilasrao Deshmukh Government Medical College (HT_PRINT)

Latur Suicide Case : गेल्या काही दिवसांपासून साक्षी तणावाखाली होती. याबाबत तिनं कुणाशीची चर्चा केली नव्हती. कॉलेजमध्ये जाण्यासाठी मुली साक्षीला बोलावण्यासाठी तिच्या खोलीत गेल्या तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.

  • Latur Suicide Case : गेल्या काही दिवसांपासून साक्षी तणावाखाली होती. याबाबत तिनं कुणाशीची चर्चा केली नव्हती. कॉलेजमध्ये जाण्यासाठी मुली साक्षीला बोलावण्यासाठी तिच्या खोलीत गेल्या तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.

Suicide Case In Vilasrao Deshmukh Government Medical College : वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या औरंगाबादच्या विद्यार्थीनीनं लातुरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं शहरात खळबळ उडाली असून साक्षी गायकवाड असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून साक्षी तणावाखाली होती, त्याबाबत तिनं कुणाशीही चर्चा केलेली नव्हती. त्यामुळं आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून साक्षीनं नेमकं कशामुळं टोकाचं पाऊल उचललं, याबाबतचा तपास केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

मिळालेल्या माहितीनुसार, एमबीबीएसच्या प्रथम वर्गात शिकणारी साक्षी गायकवाड ही गेल्या काही दिवसांपासून वसतीगृहातच राहत होती. वर्गातही हजर राहत नसल्यामुळं ती खोलीतच अभ्यास करत असल्याचं तिच्या मैत्रिणींना वाटत होतं. परंतु गेल्या काही दिवसांपासून साक्षी वर्गात येत नसल्यामुळं तिची विचारपूस करण्यासाठी काही विद्यार्थीनींनी तिच्या खोलीच्या दिशेनं गेल्या. त्यावेळी तरुणींना साक्षीचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयात एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांसह प्राचार्यांनी साक्षीच्या खोलीच्या दिशेनं धाव घेतली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसही महाविद्यालयात दाखल झाले. पोलिसांनी साक्षीचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवला असून तिच्या खोलीची तपासणी सुरू केली आहे. साक्षीनं आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या