मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange Patil : मनोज जरांगे ‘या’ नेत्यांच्या सांगण्यावरून काम करतात, सहकाऱ्यांनी थेट पुरावाच दाखवला

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे ‘या’ नेत्यांच्या सांगण्यावरून काम करतात, सहकाऱ्यांनी थेट पुरावाच दाखवला

Feb 25, 2024, 11:01 PM IST

  • Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी बाबुराव वाळेकर यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते राष्ट्रवादीसाठी काम करत असल्याचे म्हटले आहे.

manoj jarange patil

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी बाबुराव वाळेकर यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते राष्ट्रवादीसाठी काम करत असल्याचे म्हटले आहे.

  • Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी बाबुराव वाळेकर यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते राष्ट्रवादीसाठी काम करत असल्याचे म्हटले आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या अनेक वर्षातील सहकारी व कीर्तनकार अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे खोटं बोलत असून त्याच्या सरकारसोबत गुप्त बैठका झाल्याचा खळबळजनक दावा केला असतानाच आता जरांगे यांच्या अन्य तीन जुन्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. जरांगे यांनी आमचं आयुष्य बर्बाद केल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

मनोज जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी बाबुराव वाळेकर यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, मी मनोज जारंगे पाटील यांचा १८ वर्षांपासून सहकारी आहे.  कोपर्डी घटनेतील आरोपींवर आपण हल्ला करायचा असं मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला सांगितले होतं. त्यामुळे आम्ही कोर्टात हल्ला केला. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी पळ काढला. मनोज जरांगे पाटील यांनी १० ते १२  जणांचे संसार उध्वस्त केले. कोपर्डी घटनेत आम्ही २ वर्ष जेलमध्ये होतो.

आंतरवाली सराटीमध्ये पहिल्यांदा उपोषण करताना राजेश टोपे यांच्या घरात बैठक घेतली. त्यानंतर पुढच्या १५ मिनिटात दगडफेक झाली. महिलांची ढाल बनवली. आम्हाला दगडफेक करायचा निरोप दिला होता. २०१९ पासून मनोज जरांगे पाटील राजकारण करत असून राष्ट्रवादीचे काम करतात. राष्ट्रवादीला पाठिंबा देतात. शरद पवार आणि राजेश टोपे यांनी त्यांना मदत केली आहे. राष्ट्रवादी व राजेश टोपे यांच्यासाठी ते काम करतात व आम्हालाही ते करायला लावतात. आजही त्यांच्यासोबत जे आहे ते राष्ट्रवादीचेच आहेत, असे गंभीर आरोप बाबुराव वाळेकर यांनी करत राजेश टोपे यांच्यासोबत व्यासपीठावर बसले असतानाचा जरांगे याचा फोटो पत्रकार परिषदेत दाखवला. 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या