शिंदे-फडणवीस सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत आंदोलन सुरुच ठेवले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याचदरम्यान, मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी हवा आहे, असा गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर निघाले आहेत. हातातील सलाईन काढून फेकून देत जरांगे मुंबईकडे निघाल्याने अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळी एकच गोंधळ उडाला.
मला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो, मला मारुन दाखवावं, असं आव्हान मनोज जरांगे यांनी केले आहे.
मनोज जरांगे यांनी आज अंतरावाली सराटीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. काही लोकांना पुढे करुन मला बदनाम करण्याचा डाव सरकारचा असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. मला संपवण्याचं कटकारस्थान होत असेल तर आता मीच मुंबईतील सागर बंगल्यावर येतो, असे म्हणत जरांगे आपल्या जागेवरुन उठले व चालत जाऊ लावले. ते अचानक आंदोलन स्थळावरून उठल्याने कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला. त्यांना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हातातील सलाईन काढून फेकले. सागर बंगल्याकडे जातोय म्हणत ते चालत निघाले आहेत.
जरांगे म्हणाले की, राज्यात जे काही चालू आहे, फडणवीसांमुळेच सुरू आहे. सगेसोयरे अध्यादेश काढण्यासाठी किंवा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास फडणवीसांचा विरोध असल्याचं जरांगे यांनी म्हटले. जरांगे यांनी आपल्या भाषणात फडणवीसांवर गंभीर आरोप करताना, तुम्हाला माझा बळी हवा आहे, मग मी सागर बंगल्याकडे येत आहे. यावेळी, जर रस्त्यातच माझा बळी गेल्यास मला सागर बंगल्यावर नेऊन टाका, असेही जरांगे यानी म्हटले.
संबंधित बातम्या