मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुसरीकडं रडत राहायचं; OBC आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांनी भुजबळांना सुनावले!

एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुसरीकडं रडत राहायचं; OBC आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांनी भुजबळांना सुनावले!

Jan 29, 2024, 06:39 PM IST

  • Prakash Ambedkar Advice Chhagan Bhujbal : छगन भुजबळ हे मंत्री आहेत. ओबीसींवर अन्याय होतोय असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय.

Prakash Ambedkar - Chhagan Bhujbal

Prakash Ambedkar Advice Chhagan Bhujbal : छगन भुजबळ हे मंत्री आहेत. ओबीसींवर अन्याय होतोय असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय.

  • Prakash Ambedkar Advice Chhagan Bhujbal : छगन भुजबळ हे मंत्री आहेत. ओबीसींवर अन्याय होतोय असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय.

Prakash Ambedkar Advice Chhagan Bhujbal : कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना व त्यांच्या सग्यासोयऱ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसा अध्यादेश काढण्यात आला आहे. त्यावरून सध्या राजकीय वितंडवाद सुरू आहे. राज्य सरकारमधील एक मंत्री छगन भुजबळ यांनीच सरकारच्या निर्णयास विरोध केला आहे. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांना सुनावलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन ओबीसीतील ३७४ जातींवर अन्याय केला आहे, असं भुजबळ यांचं म्हणणं आहे. ओबीसी नेत्यांच्या बैठकीत या निर्णयाविरोधात ठराव करण्यात आला आहे. छगन भुजबळ हे प्रत्येक ठिकाणी सरकारच्या निर्णयाविरोधात बोलत आहेत.

Rajya sabha election 2024 : महाराष्ट्रासह १५ राज्यातील ५६ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला मतदान

प्रकाश आंबेडकर यांना याबाबत विचारलं असता त्यांनी भुजबळांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. ‘छगन भुजबळ हे कॅबिनेटमध्ये आहेत. त्यांनी सार्वजनिकरित्या भांडण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये म्हणणं मांडायला हवं. तिथं त्यांचं ऐकलं जात नसेल तर त्यांनी ओबीसींसाठी मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा. म्हणजे मग त्यांच्या बोलण्याला वजन येईल. नाहीतर एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुसरीकडं रडत राहायचं. दोन्ही एकाच वेळी कसं चालेल?,’ असा खोचक टोला प्रकाश आंबेडकर यांनी हाणला.

एकनाथ शिंदे यांनी सिक्सर मारलाय!

आरक्षणाच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. 'एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे सर्वात उत्तुंग नेते झालेत. त्यांनी सिक्सर मारलाय. त्यांच्या सिक्सरमुळं इतर मराठा नेते बोल्ड झाले आहेत, असं ते म्हणाले.

'भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी एक खेळ केला होता. भाजपनं ओबीसींना गोंजारत राहायचं आणि शिंदेंनी जरांगे पाटलांशी बोलत राहायचं. यात एकनाथ शिंदे जिंकलेत अशी परिस्थिती आहे, असं आंबेडकर म्हणाले.

Uddhav Thackeray : पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर, उद्धव ठाकरे भडकले!

भाजपनं फसवल्याची ओबीसींची भावना

'भाजप ओबीसीला विश्वास देत होता. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं भाजपचे नेते म्हणत होते, मात्र आरक्षणाला धक्का लागलाय असं दिसतंय. भाजपनं फसवल्याची ओबीसींची भावना झालीय. मराठा समाजातून भाजप आधीच बोल्ड आउट झालेला आहे. आता ओबीसीही नाराज झालेत. त्यामुळं सगळ्यात मोठा लॉस भाजपचा झालाय, असा दावा आंबेडकर यांनी केला.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या