मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rajyasabha election 2024 : महाराष्ट्रासह १५ राज्यातील ५६ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला मतदान

Rajyasabha election 2024 : महाराष्ट्रासह १५ राज्यातील ५६ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला मतदान

Jan 29, 2024 06:41 PM IST

Rajya Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

Rajya sabha election 2024
Rajya sabha election 2024

महाराष्ट्रासह देशातील १५ राज्यातील ५६  राज्यसभा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या सर्व जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग (ECI) कडून सोमवारी याबाबत घोषणा केली आहे.१३ राज्यातील ५०  राज्यसभा सदस्यांचा  कार्यकाळ २ एप्रिल रोजी समाप्त होत आहे. तर २ राज्यातील ६ सदस्य ३ एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. ज्या १५ राज्यात राज्यसभा निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र,  बिहार,  पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगाणा,  राजस्थान, कर्नाटक,  उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश आदि राज्यांचा समावेश आहे. 

राज्यसभेच्या ज्या खासदारांचा कार्यकाळ एप्रिलमहिन्यात संपणार आहे, त्यामध्ये ९ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (हिमाचल प्रदेश), रेल्वे, आयटी व संचार मंत्री अश्विनी वैष्णव (ओडिशा), आयटी राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर (कर्नाटक), सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (महाराष्ट्र), शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (मध्य प्रदेश), आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया (गुजरात) आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव (राजस्थान) आहेत. 

कोणत्या राज्यात किती जागा रिक्त - 
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (राजस्थान) यांचा कार्यकाळही यावर्षी एप्रिल महिन्यात संपणार आहे. २ एप्रिल २०२४ रोजी उत्तर प्रदेशातील १०, महाराष्ट्र आणि बिहारमधून प्रत्येकी ६-६, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून ५-५, गुजरात आणि कर्नाटकमधून ४-४, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणामधून ३-३ आणि छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातून प्रत्येकी १ राज्यसभा खासदार निवृत्त होणार आहेत. महाराष्ट्रातून निवृत्त होणाऱ्या राज्यसभा खासदारांमध्ये राणे, माजी माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आणि वरिष्ठ भाजप नेते व्ही. मुरलीधरन यांचा समावेश आहे. शिवसेना (यूबीटी) खासदार अनिल देसाई, एनसीपीच्या वंदना चव्हाण आणि काँग्रेसचे कुमार केतकर निवृत्त होत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांच्या ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. राज्यसभा निव़डणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे -

  • अधिसूचना जाहीर होण्याची तारीख - ८ फेब्रुवारी.
  • अर्ज करण्याची मुदत - १५ फेब्रुवारी
  • उमेदवारांच्या अर्जांची छाननी -  १६ फेब्रुवारी
  • अर्ज मागे घेण्याची तारीख – २० फेब्रुवारी 
  • मतदान -  २७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत. 
  • मतमोजणी - २७ तारखेलाच सायंकाळी मतमोजणी व निकाल जाहीर.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर