मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यातील 'त्या' भूखंडावरून मनोहर जोशी आले होते अडचणीत; द्यावा लागला होता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

पुण्यातील 'त्या' भूखंडावरून मनोहर जोशी आले होते अडचणीत; द्यावा लागला होता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

Feb 23, 2024, 10:42 AM IST

    • Manohar joshi and Pune land sacm : मुख्यमंत्री मनोहर जोशी मुख्यमंत्री असतांना पुण्यातील एका भूखंड वाटपवरून अडचणीत आले होते. त्यांनी ही जागा त्यांच्या जवयाला दिल्याचा आरोप होता. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
Manohar Joshi life

Manohar joshi and Pune land sacm : मुख्यमंत्री मनोहर जोशी मुख्यमंत्री असतांना पुण्यातील एका भूखंड वाटपवरून अडचणीत आले होते. त्यांनी ही जागा त्यांच्या जवयाला दिल्याचा आरोप होता. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

    • Manohar joshi and Pune land sacm : मुख्यमंत्री मनोहर जोशी मुख्यमंत्री असतांना पुण्यातील एका भूखंड वाटपवरून अडचणीत आले होते. त्यांनी ही जागा त्यांच्या जवयाला दिल्याचा आरोप होता. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

Manohar joshi and Pune land sacm : राज्यात पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर १९९५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री होण्याचा मान दिला. मुख्यमंत्री पदाचा भव्य शपथ विधी देखील शिवाजी पार्कवर झाला होता. दरम्यान, चार वर्षांनंतर पुण्यातील एका भूखंडावरून मनोहर जोशी यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. या भूखंडावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यावर थेट बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा द्या असा आदेश दिल्यावर त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले होते.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Manohar Joshi: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन, राजकीय वर्तुळातून शोक

मनोहर जोशी मुख्यमंत्री असतांना त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यांची करकरकीर्द व्यवस्थित सुरू असतांना १९९९ मध्ये त्यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले. पुण्यातील प्रभात रोड ३० हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट (क्र. ११०) हा त्यांनी त्यांचे जावई गिरीश व्यास यांनी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. हा भूखंड शाळेसाठी राखून ठेवण्यात आला होता. मात्र, मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी या भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच मुख्यमंत्री जोशी ही आपल्या मर्जिने कारभार चावतात असे देखील आरोप त्यांकयावर झाले होते. या आरोपांची दाखल थेट मातोश्रीने घेतली.

Manohar Joshi : भिक्षुकी, शिपाई ते मुख्यमंत्री व लोकसभा सभापती, असा होता मनोहर जोशींचा थक्क करणारा जीवनप्रवास

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या आरोपांची गंभीर दखल घेत जोशी यांना पत्र पाठवले, तु्म्ही आता जेथेही असाल तेथे, कृपया सर्वकाही थांबवा. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करुन मला भेटायला या, असा या पत्रात लिहिले होते. मातोश्रीवरुन आलेला हा आदेश जोशी यांनी पाळला. तसेच कोणतीही कुरकुर न करता त्यांनी तात्काळ राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत, बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती.

दरम्यान, या प्रकरणी मनोहर जोशी यांच्याविरोधात चौकशी समिती नेमण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला होता. हा निर्णय पुढे सुप्रीम कोर्टाने रद्द केला. मनोहर जोशी यांचे कोहिनूर कंपनीचे हॉटेल देखील पुण्याच्या आपटे रोड वर आहे. ते जेव्हा पुण्यात येत असतं तेव्हा या ठिकाणी मुक्कामी थांबत असतं.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या