मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manohar Joshi : भिक्षुकी, शिपाई ते मुख्यमंत्री व लोकसभा सभापती, असा होता मनोहर जोशींचा थक्क करणारा जीवनप्रवास

Manohar Joshi : भिक्षुकी, शिपाई ते मुख्यमंत्री व लोकसभा सभापती, असा होता मनोहर जोशींचा थक्क करणारा जीवनप्रवास

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 23, 2024 09:18 AM IST

Manohar Joshi life : मनोहर जोशी यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला. त्यांची परिस्थिती हलाखीची होती. मात्र, त्यांनी हार मानली नाही. सुरुवातीपासून संघर्षमय जीवन करत त्यांनी त्याचे शैक्षणिक आणि राजकीय करियर घडवले.

Manohar Joshi life
Manohar Joshi life

Manohar Joshi life : कडवे शिवसैनिक आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे सभापती मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. मनोहर जोशी यांचे जीवन संघर्षमय राहिले आहे. अत्यंत हलखीच्या परिस्थितीतीतून त्यांनी त्यांचे शैक्षणिक आणि राजकीय करियर केले. त्यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला. वडिलांची परिस्थिती बेताची असतांना त्यांनी हार मानली नाही. सुरुवातीपासून संघर्षमय जीवन करत त्यांनी त्याचे शैक्षणिक आणि राजकीय करियर घडवले.

Manohar Joshi Passed Away: कडवे शिवसैनिक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी इथं झाला. त्यांचे बालपण खडतर केले. जोशी यांनी त्यांच्या वडिलांबरोबर भिक्षुकी केली त्यावर ते जीवन जगत असतांना त्यांच्या वडिलांनी त्यांना मुंबईत त्यांच्या मामाकडे पाठवले. यावेळी ते सहावीत होते. मामा सोबत राहत असतांना देखील ते स्वाभिमानी राहिले. लहानपणी ते अनेकदा नांदवी गावात शेजाऱ्यांच्या घरी जेवण करून अभ्यास करायचे. जोशी म्हणायचे की जेवायला उशीर झाला तर शेजारी तक्रार करायचे आणि काही वेळातर जेवायलाही द्यायचे नाही. यामुळे आयुष्यात ते अगदी वक्तशीर झाले आणि त्यांनी ही सवय शेवटपर्यंत कायम घेवली.

मनोहर जोशी यांनी गोल्फ मैदानात शिपाही म्हणून नोकरी केली. या दरम्यान, त्यांनी त्यांचे शिक्षण देखील सुरू ठेवले. यावेळी ते मितरासोबत भाड्याच्या खोलीत राहायचे. तर महाजन बाईं यांच्याकडे त्यांनी मेस लावत त्यांच्याकडे जेवायला जात होते.

Pune Drugs racket : पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड आला समोर; काटमांडू मार्गे कुवेतला पळाला, लुकआउट नोटिस जारी

सुरवातीपासून पासून त्यांनी त्यांचा संघर्ष कायम ठेवला. अकरावीला शिकण्यासाठी ते मुंबईला बहिणीकडे राहिले. यावेळी त्यांनी सहत्रबुध्दे क्लासमध्ये शिपायाची नोकरी स्वीकारली आणि स्वबळावर त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आधी किर्ती कॉलेजमधुन बी. ए. पूर्ण केले. तसेच कायद्याचे शिक्षणही घेतले. यानंतर त्यांनी मुंबई महानगरपलिकेत क्लार्कची नोकरी सुरू केली.

दरम्यान, त्यांनी १९६१ ला नोकरी सोडून कोहिनूर ग्रुपची स्थापना केली. कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट द्वारे त्यांनी शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन नोकरी किवा व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण दिले. कोहिनूर ग्रुपची शिक्षण क्षेत्राबरोबरच हॉटेल, हॉस्पिटल, बांधकाम व विकास आणि उर्जा क्षेत्रात भरभराट झाली आहे.

मनोहर जोशी यांनी मुंबई महानगर पालिकेची नोकरी सोडून बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत शिवसेनेचे काम सुरू केले. येथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. १९७६-१९७७ काळात मुंबईचे महापौर होते. यानंतर त्यांचा राजकीय प्रवास हा भरभराटीचा राहिला. यानंतर शिवसेनेकडून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. १९९०ते १९९१ मध्ये ते विधानपरिषदेवर आमदार झाले. या काळात ते बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. यामुळे १९९५ मध्ये जेव्हा राज्यात युतीचे सरकार आले तेव्हा त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनवले. शिवाजी पार्कवर त्यांचा मोठा शपथविधी झाला होता. १९९९ ते २००२ केंद्रीय मंत्रिमंडळात मानव संसाधन विकास मंत्री म्हणूनही त्यांना जबाबदारी देण्यात आली. तर २००२ ते २००४ दरम्यान, त्यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. यानंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

WhatsApp channel