मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update: मुंबई पुण्यात उष्णतेची लाट तर विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा; असे असेल आजचे हवामान

Maharashtra Weather Update: मुंबई पुण्यात उष्णतेची लाट तर विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा; असे असेल आजचे हवामान

Apr 25, 2024, 06:33 AM IST

    • Maharashtra Weather Update: राज्यात हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. हवामान मोठ्या प्रमाणात बदल आहे. मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई पुण्यात उष्णतेची लाट तर विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा; असे असेल आजचे हवामान

Maharashtra Weather Update: राज्यात हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. हवामान मोठ्या प्रमाणात बदल आहे. मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    • Maharashtra Weather Update: राज्यात हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. हवामान मोठ्या प्रमाणात बदल आहे. मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात तापमानात मोठे चढ उतार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमान वाढ तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना आणि वीजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यात उष्णतेची लाट तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथे २८ एप्रिल पर्यंत उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर औरंगाबाद, जालना, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याने या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

Amit Shah On Pawar : शरद पवार म्हणतात, अमरावतीकरांची माफी मागतो, मग ‘त्या’ कुटुंबांची माफी कधी मागणार?, अमित शहांचा सवाल

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, द्रोणिका रेषा आज मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत कर्नाटक मधून जात आहे. कोकण गोव्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे, तसेच कोकण गोव्यात पुढील ३ दिवस तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये पुढील पाच ते सहा दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाट सहित वादळी वारा व पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा आणि पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात वादळी वाऱ्याची गती ताशी ४० ते ५० किलोमीटर इतकी राहील.

Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

पुण्यात असे असेल हवामान

पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील पाच ते सात दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर २४ व २६ एप्रिल मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. असे असले तरी कमाल व किमान तापमानात मात्र फारसा बदल होणार नाही.

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा पुढील दौरा रद्द, ‘या’ कारणामुळे लातुरातच करावा लागला मुक्काम

मुंबईत उकाड्याने नागरिक हैराण

मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथे २८ एप्रिल पर्यंत उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडतांना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

नागपुर, चंद्रपूर, वर्धा येथे वादळी वाऱ्यासह पाऊस

नागपूर, चंद्रपूर, वर्धा येथे गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या