मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  CM Shinde: प्रेम, दया, करुणा... धनंजय मुंडेंबद्दल मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळं वेगळीच चर्चा

CM Shinde: प्रेम, दया, करुणा... धनंजय मुंडेंबद्दल मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळं वेगळीच चर्चा

Aug 22, 2022, 06:02 PM IST

    • Eknath Shinde speech in Vidhan Sabha: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळं एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
Dhananjay Munde - Eknath Shinde

Eknath Shinde speech in Vidhan Sabha: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळं एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

    • Eknath Shinde speech in Vidhan Sabha: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळं एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

Eknath Shinde speech in Vidhan Sabha: नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांनी विरोध केला. भाजपचं ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेत असल्याचा आरोपही झाला. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ व्हावं, ‘ऐकनाथ’ होऊ नये, असा खोचक टोला धनंजय मुंडे यांनी हाणला होता. या सगळ्या टीकेला शिंदे यांनी आज सविस्तर उत्तरं दिली.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

विधीमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षांचे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून शिंदे गटाच्या आमदारांना लक्ष्य करत आहेत. पहिल्या दिवशी गद्दारांना भाजपची ताटवाटी… चलो गुवाहाटी… अशी घोषणा देण्यात आली. दुसऱ्या दिवशी पन्नास खोके, एकदम ओके… अशी घोषणा देण्यात आली. आज पन्नास खोके, माजलेत बोके… असं म्हणत शिंदे गटाच्या आमदारांना लक्ष्य करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे हे घोषणा देण्यात आघाडीवर होते.

विरोधकांनी नगराध्यक्षांच्या निवडीवर उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरील घोषणाबाजीचाही उल्लेख केला. धनंजय मुंडे हेही बेंबीच्या देठापासून ओरडून घोषणा देत होते. घसा खराब होईपर्यंत बोलत होते. अनेक वर्षांपासूनचे शिवसैनिक असल्यासारखे घोषणा देत होते. पण त्यांचा संपूर्ण प्रवास मला माहीत आहे. त्यावेळेस देवेंद्रजींनी त्यांच्याबद्दल प्रेम, दया, करुणा दाखवली होती,' असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर सभागृहात एकच हशा पिकला. मुख्यमंत्री शिंदे यांचा रोख २०१९ च्या विधानसभा निवडणुकीकडे होता की करुणा मुंडे यांच्याशी संबंधित प्रकरणाकडं होता यावरून आता चर्चा रंगली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या