मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral News : राजापूर पोलीस ठाण्यात बिबट्या घुसला आणि कुत्र्याची मानगूटच पकडली!

Viral News : राजापूर पोलीस ठाण्यात बिबट्या घुसला आणि कुत्र्याची मानगूटच पकडली!

Jan 28, 2024, 10:42 AM IST

  • Rajapur Police station Viral Video : रत्नागिरीतील राजापूर पोलीस ठाण्यात घुसलेल्या बिबट्यानं एका कुत्र्याची शिकार केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

Leopard in Rajapur police station

Rajapur Police station Viral Video : रत्नागिरीतील राजापूर पोलीस ठाण्यात घुसलेल्या बिबट्यानं एका कुत्र्याची शिकार केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

  • Rajapur Police station Viral Video : रत्नागिरीतील राजापूर पोलीस ठाण्यात घुसलेल्या बिबट्यानं एका कुत्र्याची शिकार केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

Rajapur Police Station News : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर पोलीस ठाण्यात घुसून एका बिबट्यानं कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

बुधवार, २४ जानेवारी रोजी ही घटना घडली. पोलीस ठाण्यात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. काही भटक्या कुत्र्यांच्या मागे एक बिबट्या पोलीस ठाण्यात घुसल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. बिबट्याच्या भीतीनं पोलीस ठाण्यात घुसलेले कुत्रे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गेले. त्यांच्या मागोमाग बिबट्या घुसला आणि पहिल्या खोलीत गेला. तिथं त्यानं एका कुत्र्याची मानगूट पकडली आणि त्याला घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारातील पाण्याच्या टाकीच्या दिशेनं गेला.

शिवरायांशी तुलना व्हावी असं कोणतं अचाट काम मोदींनी केलं?; संजय राऊत यांचा रोकडा सवाल

पोलीस कर्मचाऱ्यांपैकी कुणीही जखमी नाही!

बिबट्या पोलीस ठाण्यात घुसल्याचं पाहून आधी तिथले कर्मचारीही भयभीत झाले. असं काही होईल अशी अपेक्षाही त्यांनी कधी केली नसेल. त्यांनी लगेच सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. बिबट्यानं इतर कुणावरही हल्ला केला नाही. कुत्र्याला घेऊन तो बाहेर पडल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Leopard in Police Station

इतर कुत्रे पळून गेले!

बिबट्याच्या भीतीनं चार ते पाच कुत्रे पोलीस ठाण्यात घुसले होते. मात्र बिबट्या एकाच कुत्र्याला घेऊन गेला. त्यामुळं बाकीचे कुत्रे वाचले. त्यांनी लगेचच तिथून धूम ठोकली. या घटनेमुळं जंगली प्राण्यापासून असलेला धोका ऐरणीवर आला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या