पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानने आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. त्याच्या प्रत्येक गाण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतात. आता राहत फतेह अली खानशी संबंधीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याने घरात काम करणाऱ्या नोकराला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राहत नोकराचे केस पकडतो, त्यानंतर हातात चप्पल घेऊन त्याला मारताना दिसतो. नोकर घाबरुन राहत पासून लांब जातो. पण तो पुन्हा त्याच्या जवळ जातो आणि विचारतो दारुची बाटली कुठे ठेवली आहे? नोकर शांत बसतो. राहत पुन्हा त्याचे केस पकडतो आणि त्याला मारहाण करतो. तो खाली पडतो. आजूबाजूला उभे असलेले लोक त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, राहत त्याला सतत मारहाण करत असतो.
वाचा: गांजा घेतल्यानंतर मला मजा येते; नवाजुद्दीन सिद्दीकीचे खळबळजनक वक्तव्य
सध्या सोशल मीडियावर राहत फतेह अली खानचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकजण हा व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. काहींनी राहतला त्याच्या या कृतीवरुन सुनावले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राहतने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो नोकराची माफी मागताना दिसत आहे. त्यानंतर तो शागिर्द आणि उस्ताद यांच्याशी बोलत आहे. 'माझ्या सोबत माझा मुलगा शागिर्द आहे. एक उस्ताद आणि शागिर्द यांच्यासोबत माझे वेगळेच नाते आहे. जर चांगले काम केले तर मी त्यांच्यावर प्रेम करतो आणि चुकीचे वागले तर त्यांचा कान पकडतो' असे तो व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.