मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lalit Patil : जुन्या साथीदाराला फोन केला अन् घात झाला; ‘असा’ अडकला ललित पाटील जाळ्यात

Lalit Patil : जुन्या साथीदाराला फोन केला अन् घात झाला; ‘असा’ अडकला ललित पाटील जाळ्यात

Oct 18, 2023, 10:19 AM IST

    • Lalit Patil Arrested: गेल्या १५ दिवसांपासूंन पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ड्रग्स माफिया ललित पाटलाला मुंबई साकीनाका पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्याला अटक करण्यासाठी आखण्यात आलेल्या जाळ्यात तो अलगद अडकला. 
drugs mafia Lalit Patil arrested in Bangalore

Lalit Patil Arrested: गेल्या १५ दिवसांपासूंन पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ड्रग्स माफिया ललित पाटलाला मुंबई साकीनाका पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्याला अटक करण्यासाठी आखण्यात आलेल्या जाळ्यात तो अलगद अडकला.

    • Lalit Patil Arrested: गेल्या १५ दिवसांपासूंन पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ड्रग्स माफिया ललित पाटलाला मुंबई साकीनाका पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्याला अटक करण्यासाठी आखण्यात आलेल्या जाळ्यात तो अलगद अडकला. 

पुणे : तब्बल १५ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ललित पाटलाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तो रोज नवे नवे फोन वापरत असल्याने पोलिसांना त्याच्या थांगपत्ता लागत नव्हता. मात्र, या ननंतर साकीनाका पोलिसांनी सापळा रचला अन् पाटील त्यात अलगद अडकला.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune Drugs Case: मोठी बातमी ! कुख्यात ड्रग्स तस्कर ललित पाटलाच्या मुसक्या आवळल्या; बंगलोर येथून अटक

पुण्यातील ससुन हॉस्पिटल मधून २ ऑक्टोबर रोजी फरार झाल्यावर ललित पाटील हा चांगलाच चर्चेत आला होता. त्याने केलेल्या ड्रग्स तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्याने राज्यातील मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला.दरम्यान, मुंबई पोलिसांच्या साकीनाका पोलिसांनी गुप्तपणे ललितच्या नाशिकच्या कारखान्यावर छापा टाकत ३५० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले. त्याच्या भावाला आणि आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आली. मात्र, ललित पाटील हा फरार होता.

ललित पाटील सापडत नसल्याने अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप देखील झाले. एक नेता त्याला मदत करत असल्याचा खळबळजनक आरोप देखील करण्यात आला. यामुळे राज्याचे वातावरण ढवळून नाइट होते.

Pune Drug racket : तुरुंगात असतानाच ड्रग्स बनवायला शिकला; तस्कर ललित पाटील असं चालवायचा रॅकेट

ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय ड्रग्स व्यापरांचा सिंडीकेट

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला आज सकाळी अटक करण्यात आली. बंगलोर येथे त्याला अटक करण्यात आली. मुंबई साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग तस्करीचा सिंडिकेट मेंबर आहे. फरार ललित पाटलला शोधण्यासाठी पोलिस मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवत होते. मात्र, तो सापडत नव्हता. अखेर त्याने एक चूक केली, अन तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Sushma Andhare : ससून ड्रग्ज प्रकरणात दादा भुसेंसोबत आणखी दोन मंत्र्यांचा सहभाग; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

ड्रग्स माफिया ललित पाटील असा फासला पोलिसांच्या जाळ्यात

ललित पाटील याच्या मागावर पुणे पोलिसांचे १० पथके, मुंबई पोलिसांचे ३ पथके तर नाशिक पोलिसांचे पथकही मागावर होते. दरम्यान, साकीनाका पोलिस सुरवातीपासून ललितच्या मागावर होते. मात्र, तो गुंगारा देत होता. दरम्यान, साकीनाका पोलिसांनी सापळा रचला. साकीनाका पोलीसांच्या ताब्यात एक आरोपी होता. या आरोपीला त्याने कॉल केला अन् ललित पाटील फसला. यानंतर देखील ललित पाटील हा या आरोपीच्या संपर्कात होता. यामुळे ललित पाटील कुठे कुठे फिरतोय याची माहिती साकीनाका पोलिसांना मिळत होती.

ससुन येथून फरार झाल्यावर ललित पाटील हा एका ट्रॅव्हल कंपनीच्या कारने त्याच्या दोन साथीदारांसोबत आधी गुजरातला गेला. तेथून तो धुळे मग कर्नाटक आणि नंतर बंगळूरूला पोहचला. बंगरूळ येथे तो एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती साकीनाका पोलिसांना मिळाली. त्यानुसार काल पथक रवाना झाले. पाटील ज्या ठिकाणी लपला होता. तेथे सापळा रचण्यात आला. आणि रात्री १२.३० च्या दरम्यान त्याला अटक करण्यात आली. आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत त्याला मुंबईत आणण्याची शक्यता आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या