मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Indian Railway : मध्य रेल्वेची मोठी घोषणा! राज्यातून उत्तर भारतात जाण्यासाठी १५६ उन्हाळी स्पेशल गाड्या धावणार

Indian Railway : मध्य रेल्वेची मोठी घोषणा! राज्यातून उत्तर भारतात जाण्यासाठी १५६ उन्हाळी स्पेशल गाड्या धावणार

Apr 02, 2024, 07:02 AM IST

    • Indian Railway Special train for North India : मध्य रेल्वे बनारस, दानापूर, समस्तीपूर, प्रयागराज, गोरखपूर दरम्यान १५६ उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.
मध्य रेल्वेची मोठी घोषणा! राज्यातून उत्तर भारतात जाण्यासाठी १५६ उन्हाळी स्पेशल गाड्या धावणार

Indian Railway Special train for North India : मध्य रेल्वे बनारस, दानापूर, समस्तीपूर, प्रयागराज, गोरखपूर दरम्यान १५६ उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.

    • Indian Railway Special train for North India : मध्य रेल्वे बनारस, दानापूर, समस्तीपूर, प्रयागराज, गोरखपूर दरम्यान १५६ उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.

Railway Special train for North India : उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने उत्तर भारतात जाण्यासाठी राज्यातून १५६ रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई आणि पुण्याहून तसेच राज्याच्या इतर स्थानकाहून सुटतील.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Maharashtra Weather Update : एप्रिल महिन्यात राज्य तापणार; मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट

लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस साप्ताहिक विशेष (२६ फेऱ्या)

०१०५३ साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ३ एप्रिल ते २६ जून दरम्यान, (१३ फेर्‍या) दर बुधवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता बनारस येथे पोहोचेल.

०१०५४ साप्ताहिक विशेष गाडी ही ४ एप्रिल ते २७ जून दरम्यान, (१३ फेर्‍या) दर गुरुवारी बनारस येथून १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

Pune Water Cut : पुण्यातील पेठांचा भाग वगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा ‘या’ दिवशी राहणार बंद

या गाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, जेनाथपूर आणि वाराणसी येथे थांबे देण्यात आले असून या गाडीत एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन वातानुकूलित- द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ३ सेकंड सीटिंग चेअर कार, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार डब्बा जोडला जाणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर द्वि-साप्ताहिक विशेष (५२ फेऱ्या)

०१४०९ द्वि-साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १ एप्रिल ते २९ जून दरम्यान, (२६ फेऱ्या) दर सोमवार आणि शनिवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ५ वाजता दानापूर येथे पोहोचेल.

०१४१० द्वि-साप्ताहिक विशेष दानापूर २ एप्रिल ते ३० जून दरम्यान, (२६ फेऱ्या) दर मंगळवार आणि रविवारी सायंकाळी ६.१८ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.५३ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

या गाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे थांबा राहणार आहे.

Akola Lok Sabha: अकोल्यातून काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी, प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा नाहीच

लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर साप्ताहिक विशेष (२६ फेऱ्या)

०१०४३ साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ४ एप्रिल ते २७ जून दरम्यान (१३ फेऱ्या) दर गुरुवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १०. १५ वाजता समस्तीपूर येथे पोहोचेल.

तर ०१०४४ साप्ताहिक विशेष समस्तीपूर गाडी ५ एप्रिल ते २८ जून (१३फेऱ्या) दर शुक्रवारी रात्री ११.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकली ०७.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

या गाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर येथे थांबे असतील

लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष (२६ फेऱ्या)

०१०४५ वातानुकूलित साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ९ एप्रिल ते ०२ जून दरम्यान (१३ फेर्‍या) दर मंगळवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.०० वाजता प्रयागराज येथे पोहोचेल.

तर ०१०४६ वातानुकूलित साप्ताहिक विशेष प्रयागराज येथून १० जून ते ०३ जुलै दरम्यान, (१३ फेऱ्या) दर बुधवारी सायंकाळी ६.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४.४ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना आणि माणिकपूर येथे थांबे देण्यात आले आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर साप्ताहिक विशेष (२६ फेऱ्या)

०११२३ साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०५.०४.२०२४ ते दि. २८.०६.२०२४ (१३ फेर्‍या) दर शुक्रवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.५५ वाजता गोरखपूर येथे पोहोचेल.

०११२४ साप्ताहिक विशेष गोरखपूर दि. ०६.०४.२०२४ ते दि. २९.०६.२०२४ (१३ फेऱ्या) दर शनिवारी २१.१५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०७.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

या गाडीला ठाणे कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती येथे थांबे राहणार आहेत. या उन्हाळी विशेष गाड्यांसाठी बुकिंग सुरू झाले आहे.

पुढील बातम्या