पुणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागातील पेठांचा परिसर वगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (४ एप्रिल) बंद राहणार आहे. तर ५ एप्रिल रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान पालिकेने अघोषित पाणीकपातीला सुरुवात केल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यावर्षी दरवर्षीच्या सरासरीच्या खूपच कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणी काटकसरीने वापरण्याची सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली आहे. महापालिकेनेही पाण्याचे नियोजन करत पाणीकपातीला सुरुवात केली आहे.
वारजे जलकेंद्र आणि त्या अंतर्गत चांदणी चौक, गांधीभवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, वारजे पंपिंग, जुने वारजे केंद्र, एसएनडीटी टाकी, कोंढवा-धावडे जलकेंद्र आणि रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्रासह त्याअंतर्गत केदारेश्वर पंपिंग, आगम पंपिंग, श्रीहरी पंपिंग, भामा-आसखेड, तसेच नवीन लष्कर जलकेंद्र, रामटेकडी आणि खराडी टाकी परिसर येथे येत्या गुरुवारी (४ एप्रिल) स्थापत्य आणि विद्युतविषयक तातडीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे पेठा वगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (५ एप्रिल) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
संबंधित बातम्या