Maharashtra Weather Update : राज्यात कुठे पाऊस तर कुठे ऊन असे चित्र एप्रिल महिन्यात राहणार आहे. एप्रिल महिन्यात उकाडा वाढणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणार आहे. आज विदर्भात पाऊस पडणार आहे. मात्र, त्यानंतर तापमानात मोठी वाढ होणार आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे मराठवाड्यात नांदेड लातूर उस्मानाबाद येथे आज व उद्या रात्रीच्या वेळेस उकाडा जाणवेल तर विदर्भात अकोला व चंद्रपूर येथे चार व पाच एप्रिलला व यवतमाळला 4 एप्रिलला उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार वातावरणातील खालच्या थरातील वारांमध्ये एक दोन्ही कार रेषा दिसून येत आहे ती रेषा विदर्भ मधून जात आहे राज्यात सर्वत्र पुढील चार दिवस हवामान कोरडे राहील तसेच मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे मराठवाड्यात नांदेड लातूर उस्मानाबाद येथे आज व उद्या रात्रीच्या वेळेस उकाडा जाणवेल तर विदर्भात अकोला व चंद्रपूर येथे चार व पाच एप्रिलला व यवतमाळला ४ एप्रिलला उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
पुणे व परिसरात पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. तर वातावरण कोरडे राहणार आहे. पुण्यात सोमवारी ३९.८ डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाले तर तर २० डिग्री सेल्सिअस एवढ्या कीमान तापमानाची नोंद झाली.
विदर्भात पुढील तीन दिवस ११ जिल्ह्यात कोरडे हवामान राहतील. तर तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता नाही. विदर्भात अकोला, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात ४ एप्रिलला तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर चंद्रपूर व अकोला जिल्ह्यातील ५ एप्रिलला उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमान २३ ते २६ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २९ ते ४३ अंश सेल्सिअर राहू शकते. २ ते ३ अंश सेल्सिअसने कमाल तापमान वाढणार आहे. नागरिकांनी घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी भरपूर पाणी पिनयासोबतच, दुपारी बाहेर पडणे टाळावे असे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात मालेगाव सर्वात उष्ण ठरले आहे. मालेगावचे तापमान ४२ डिग्री सेल्सिअस पार पोहचले आहे. सोलापूर ४१ डिग्री सेल्सिअस, अकोला ४० डिग्री सेल्सिअस, ब्रह्मपुरी ४१, अमरावतीत ४० डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. विदर्भात बहुतांश जिल्ह्याचे तापमान ४० डिग्रीसेल्सिअस च्या घरात नोंदवले गेले.