मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेची लाट! मुंबई ठाण्यासह मराठवाड्यात हीट वेव्हचा तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेची लाट! मुंबई ठाण्यासह मराठवाड्यात हीट वेव्हचा तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट

Apr 30, 2024, 06:49 AM IST

    • Maharashtra Weather Update : राज्यात आज बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार आहे. सूर्य आग ओकत असून मराठवाडा, मुंबई, ठाण्यात आज उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आल आहे. तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात उष्णतेची लाट! मुंबई ठाण्यासह मराठवाड्यात हीट वेव्हचा तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट (ANI)

Maharashtra Weather Update : राज्यात आज बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार आहे. सूर्य आग ओकत असून मराठवाडा, मुंबई, ठाण्यात आज उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आल आहे. तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

    • Maharashtra Weather Update : राज्यात आज बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार आहे. सूर्य आग ओकत असून मराठवाडा, मुंबई, ठाण्यात आज उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आल आहे. तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Wether Update : राज्यात आज बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार आहे. सूर्य आग ओकत असून मराठवाडा, मुंबई, रायगड, ठाण्यासह कोकण गोव्यात आज उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आल आहे. तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात रात्री उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. आज सांगली व सोलापूर नांदेड लातूर व धाराशिव येथे काही ठिकाणी आज रात्री उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे बाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी राज्यात मालेगाव सर्वाधिक हॉट ठरले येथे ४४ डिग्री सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानांची उच्चांकी नोंद झाली.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Lok Sabha : वरळीत पोलिंग बूथवर काम करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

Bhiwandi Accident: भिवंडीत कारच्या धडकेत ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

Priyanka Gandhi : महिलांच्या मंगळसुत्राबाबत बोलणारे महिला ऑलिम्पिकपटूंवर अत्याचारावेळी कुठं होते? प्रियंका गांधींचा सवाल

ठाणे, मुंबई, रायगडसह कोकण गोव्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

आज ट्रफ किंवा द्रोनिका रेषा मध्य विदर्भ ते कर्नाटक किनारपट्टी पर्यंत मराठवाड्यातून जात आहे, त्यामुळे मराठवाडा व विदर्भामध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यात पुढील चार-पाच दिवस तुरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण असण्याची शक्यता आहे तसेच आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे मुंबई व रायगड येथे आज तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे.

Uddhav Thackeray : एक अकेला सबपे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी; उद्धव ठाकरेंची मोदींवर जहरी टीका

मध्य महाराष्ट्र मारठवड्यात देखील तापमानात होणार वाढ

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात रात्री उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. आज सांगली व सोलापूर नांदेड लातूर व धाराशिव येथे काही ठिकाणी आज रात्री उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट दिला आहे.

विदर्भात पावसाचा यलो अलर्ट

विदर्भामध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. सोमवारी विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, वाशिमच्या काही भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

Elephant Attack : गडचिरोलीत हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेचा मृत्यू; ४ दिवसात ३ जणांचे बळी

पुण्यात असे असेल हवामान

पुणे आजूबाजूच्या परिसरात पुढील पाच ते सात दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. तसेच दिवसा तापमानात मोठी वाढ राहणार आहे. पुण्यात सोमवारी ४१. ८ अशा विक्रमी तापमानाची नोंद झाली. तापमान वाढते असून घराबाहेर पडतांना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मालेगाव सर्वाधिक हॉट

राज्यात सोमवारी मालेगाव येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मालेगावमध्ये आता पर्यंतचे सर्वाधिक ४४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव जिल्ह्यात ४३/३ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नांदेड, अकोला, ब्रह्मपुरी येथे ४२ डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापनाची नोंद झाली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या