मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune raviwar peth fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीत अग्नितांडव! दुकानांना आग लागून लाखो रुपयांचं नुकसान

Pune raviwar peth fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीत अग्नितांडव! दुकानांना आग लागून लाखो रुपयांचं नुकसान

Apr 22, 2024, 09:22 AM IST

  • Pune Ravivar peth fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीत काही दुकांना आग लागून लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले आहे. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीत अग्नितांडव! दुकानांना आग लागून लाखोंच साहित्य भस्मसात

Pune Ravivar peth fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीत काही दुकांना आग लागून लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले आहे. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

  • Pune Ravivar peth fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीत काही दुकांना आग लागून लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले आहे. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

Pune raviwar peth fire : पुण्यातील रविवार पेठेतील अतिशय गजबजलेला आणि व्यापारी केंद्र असलेल्या भोरी आळीतील काही दुकांनाना आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत मोठ्या प्रमाणात दुकानातील साहित्य भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. ही आग नेमकी कशी लागली याची माहिती मिळू शकली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

रविवार पेठेतील भोरी आळीतील रामसुख चेंबर्स आणि काही दुकानांना आज पाहते ५.१० मिनिटांनी आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. अग्निशमन दलाकडून मुख्यालय, नायडू, कसबा, गंगाधाम येथून एकुण ४ फायरगाड्या व २ वॉटर टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.

Uday Samant : यवतमाळमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या कारवर दगडफेक; प्रचारसभेला जाताना घडली घटना

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी एका इमारतीत तळमजल्यावर असलेल्या काही दुकानामध्ये आग लागल्याचे दिसले. तातडीने अग्निशामक दलाच्या जवानांनी कुञिम श्वसन उपकरण (बी ए सेट) परिधान करत प्रथम इमारतीत आणि दुकानामध्ये प्रवेश करत आत कुणी अडकले आहे का याची खात्री करुन चारही बाजूने आगीवर पाण्याचा मारा सुरू केला.

दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात किराणा मालाचा साठा असल्याने व आजुबाजूला इतर दुकाने व रहिवाशी घरे असल्याने आग इतरञ पसरू नये याची दक्षता घेत जवानांनी सुमारे तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवत मोठा धोका दुर केला. दुकानातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येत असल्याने अग्निशामक दलाकडून एक्झॉस्ट ब्लोअरच (धूर बाहेर काढण्याचे यंत्र) वापर करून आजुबाजूला असणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

ITR भरतांना 'या' गोष्टींची माहिती न दिल्यास येईल नोटीस! दंडही भरावा लागणार! वाचा नेमके काय आहे प्रकरण

आगीचे कारण अस्पष्ट

या दुकानाला आग नेमकी कशी लागली याचे कारण समजू शकले नाही. या घटनेत सुदैवाने जखमी अथवा मृत्यूमुखी पडले नाहीत. ही व्यावसायिक इमारत चार मजल्यांची असून या संपूर्ण इमारतीत विविध प्रकारची छोटी मोठी दुकाने आहेत. या आगीमध्ये शांती क्रॉकरी अँन्ड गिफ्ट आर्टिकल्स या दुकानाचे पुर्ण नुकसान झाले असून दुकानातील सर्व माल जळाला आहे.

अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, पंकज जगताप, सुनिल नाईकनवरे तसेच वाहनचालक संदिप कर्णे, दत्तात्रय वाघ, अनिकेत ओव्हाळ, संदिप थोरात व जवान भाऊसाहेब चोरमले, भरत वाडकर, चंद्रकांत गावडे, आझीम शेख, दिगंबर बांदिवडेकर, गणेश कुंभार, गणेश लोणारे, संतोष अडाळगे, निकेतन पवार, अजय कोकणे, रिजवान फरास, रोहित मदनावाले, पंकज पाटील, अक्षय कांबळे यांनी ही आग नियंत्रणात आणली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या