Uday Samant : यवतमाळमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या कारवर दगडफेक; प्रचारसभेला जाताना घडली घटना
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Uday Samant : यवतमाळमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या कारवर दगडफेक; प्रचारसभेला जाताना घडली घटना

Uday Samant : यवतमाळमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या कारवर दगडफेक; प्रचारसभेला जाताना घडली घटना

Apr 22, 2024 07:37 AM IST

uday samant convoy attack in yavatmal : मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे महायुतीच्या प्रचार दौऱ्यावर असताना यवतमाळ येथे त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.

यवतमाळमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या कारवर दगडफेक; प्रचारसभेला जाताना घडली घटना
यवतमाळमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या कारवर दगडफेक; प्रचारसभेला जाताना घडली घटना

uday samant convoy attack in yavatmal : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. विदर्भात पहिल्या टप्प्यातील मतदान झाले असून आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान असल्याने यवतमाळ, वर्धा, अमरावती तसेच आदि जिल्ह्यात महायुतीचे नेते प्रचार दौरे काढत आहे. मंत्री उदय सावंत हे देखील रविवार असल्याने यवतमाळ येथे प्रचार दौऱ्यावर गेले होते. मात्र, यावेळी त्यांच्या ताफ्यावर अज्ञात व्यक्तिंनी दगडफेक केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Maharashtra Weather Update: कुठे उष्णतेची लाट तर कुठे अवकाळी पावसाची शक्यता! तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती काय ?

राज्यात महायुतीचे नेते प्रचारात गुंतले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते प्रचार दौरे काढत आहे. रविवार असल्याने यवतमाळ येथे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील गेले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर काही अज्ञात व्यक्तीने दगड फेक केली. या दगड फेकीत उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली असून या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहेत. ही घटना यवतमाळ येथील राळेगाव येथे घडली.

शेतकऱ्याला ६ हजार देऊन त्यांच्या खिशातून १२ हजार रुपये काढून घेतात; उद्धव ठाकरेंनी मांडला पीएम किसान योजनेचा लेखाजोखा

यवतमाळ जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत आले होते. राळेगाव येथे प्रचारासाठी जात असतांना वाटेत काही नागरिकांनी उदय सामंत यांच्या गाडीवर जोरदार दगड फेक केली. या दगडफेकीत गाडीचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झाले नाही. मात्र, अचानक झालेला या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली. दारमहया ही दगडफेक नेमकी कुणी केली, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. मंत्री उदय सामंत हे देखील सुरक्षित आहे.

“अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातच मारण्याचा प्रयत्न, औषधे दिली जात नाहीत”, सुनीता केजरीवाल यांचा आरोप, VIDEO

पोलिसांनी या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. तसेच या प्रकरणी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या