मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Update : राज्याला हवामान बदलाचा दुहेरी फटका; उष्णतामान वाढीबरोबर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळीचा अलर्ट

Weather Update : राज्याला हवामान बदलाचा दुहेरी फटका; उष्णतामान वाढीबरोबर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळीचा अलर्ट

May 23, 2023, 07:27 AM IST

    • Weather Update : राज्यात पुढील काही दिवस उष्णतामान वाढणार आहे. या सोबतच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन ते तीन दिवस काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
weather news (PTI)

Weather Update : राज्यात पुढील काही दिवस उष्णतामान वाढणार आहे. या सोबतच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन ते तीन दिवस काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

    • Weather Update : राज्यात पुढील काही दिवस उष्णतामान वाढणार आहे. या सोबतच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन ते तीन दिवस काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

पुणे : द्रोणीका रेषा आज विदर्भापासून तेलंगणावर रॉयल सीमेवरून दक्षिण तमिळनाडू पर्यंत जात आहे तसेच अरबी समुद्रावरून येणाऱ्या पश्चिमे वाऱ्यांमुळे राज्यावर मोईश्चर वाढ होत आहे त्यामुळे हवेतील आद्रता वाढली आहे. त्यामुळे वातावरण ढगाळ राहणार असून, पुढील दोन दिवस राज्यात तुरक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

पुढील चार ते पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात कही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, भंडारा आणि यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यात पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या सोबतच अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे.

मुंबईत तापमानात घट झाली असली तरी आद्रता वाढल्याने मुंबईकरांच्या घामाच्या धारा वाढल्या आहेत. पुढील आठवडा पुण्यातील वातावरण अंशतः ढगाळ असणार आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने वातावरण ढगाळ राहील. रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सरासरी किंवा त्यापेक्षा कमी राहील त्यामुळे अस्वस्थ वाटू शकते त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन पुणे हवामान विभागणे केले आहे.

पुण्याच्या हवामानाचा अंदाज

पुणे आणि परिसरात पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. २४, २५ रोजी आकाश ढगाळ राहणार आहे. तर २६, २७, २८ रोजी देखील आकाश निरभ्र राहून संध्याकाळी अंशत: ढगाळ राहणार आहे. हवेतील आद्रता वाढल्यामुळे वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सरासरी किंवा सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अस्वस्थ वाटण्याची शक्यता आहे. या वातावरणात शक्यतो सकाळी ११ ते दुपारी ४ घराबाहेर पडू नका, आवश्यक काम असेल तरच घरा बाहेर पडावे. बाहेर पडताना पाणी पिऊनच बाहेर पडा. पाण्याची बाटली जवळ बाळगा, काम झाल्यानंतर सावलीत थोडावेळ विश्रांती घेऊन मग पाणी द्या असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या