मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kalyan News : खळबळजनक! कल्याण रेल्वे स्थानकात आढळली डिटोनेटरनं भरलेली बॅग

Kalyan News : खळबळजनक! कल्याण रेल्वे स्थानकात आढळली डिटोनेटरनं भरलेली बॅग

Feb 21, 2024, 06:40 PM IST

  • Detonators At Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्थानकातील एका फलाटावर स्फोटकांनी भरलेली बॅग आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

Detonators Found At Kalyan Railway Station In Maharashtra

Detonators At Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्थानकातील एका फलाटावर स्फोटकांनी भरलेली बॅग आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

  • Detonators At Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्थानकातील एका फलाटावर स्फोटकांनी भरलेली बॅग आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

Kalyan Railway Station News : ठाणे जिल्ह्यातील कल्याण रेल्वे स्थानकात तब्बल ५४ डिटोनेटर सापडल्यानं खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी संशयास्पद सामुग्री ताब्यात घेतली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Chack:मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंच्या रोड शोमध्ये पाकिस्तान झेंडा ? व्हायरल व्हिडिचे सत्य उघड

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

कल्याण रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर १ च्या बाहेरील बाजूस एक बेवारस बॅग मिळून आली. संशय आल्यामुळं याबाबत पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बेवारस बॅगेची तपासणी केली असता त्यात ५४ डिटोनेटर आढळून आले.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिटोनेटर हे स्फोट घडवून आणण्यासाठी वापरले जातात. इतक्या मोठ्या प्रमाणात हे डिटोनेटर रेल्वे स्थानकात कसे आले? यामागे नेमकं कोण आहे? या सगळ्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी ही माहिती दिली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या