मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane: शालेय सहलीदरम्यान बसमध्ये खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या नराधमाचं चिमुकलींसोबत धक्कादायक कृत्य!

Thane: शालेय सहलीदरम्यान बसमध्ये खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या नराधमाचं चिमुकलींसोबत धक्कादायक कृत्य!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 21, 2024 04:05 PM IST

Thane School Girls Molested During Picnic: ठाण्यातील शालेय सहलीदरम्यान मुलींचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली.

Thane Molested News
Thane Molested News

Thane School Molested News: ठाणे येथील एका शाळेतील सहलीदरम्यान बसमध्ये खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या नराधमानं मुलींचा विनयभंग केल्याची महिती समोर आली. शाळेच्या सहलीवरून घरी परतल्यानंतर मुलांनी या घटनेची माहिती पालकांना दिली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. यामुळे शाळेला जाब विचारण्यासाठी पालकांनी शाळेत एकच गर्दी केली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्वरीत आरोपीला बेड्या ठोकल्या. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जावेद खान (वय,२७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील एका शाळेची सहल गेली होती. त्यावेळी आरोपीला बसमध्ये लहान मुलांना खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी ठेवण्यात आले होते. या सहलीदरम्यान आरोपीने अनेक मुलींचा विनयभंग केला, असा आरोप पालकवर्गांकडून करण्यात आला. तसेच त्यांनी यासंदर्भात कापूरबाबडी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

ज्या बसमध्ये मुलींचा विनयभंग करण्यात आला, त्याच बसमध्ये संबंधित शाळेतील शिक्षकही उपस्थित होते. मात्र, त्यानंतरही हा प्रकार कसा घडला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शाळा प्रशासनाकडून संबंधित शिक्षकावरही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मनसे नेते अविनाश जाधव आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय भोईदर शाळेत भेट दिली. शाळा व्यवस्थापक मुख्याध्यापकांवर कारवाई नाही करत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही, अशी आक्रमक भूमिका पालकांनी घेतली आहे.

IPL_Entry_Point

विभाग