मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sai resort demolition : शिंदे गटाच्या नेत्यावर आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा

Sai resort demolition : शिंदे गटाच्या नेत्यावर आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा

Apr 03, 2024, 04:11 PM IST

  • Sai Resort Demolition news : ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या मालकीच्या साई रिसॉर्टवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

शिंदे गटाच्या नेत्यावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई

Sai Resort Demolition news : ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या मालकीच्या साई रिसॉर्टवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

  • Sai Resort Demolition news : ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या मालकीच्या साई रिसॉर्टवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Sai Resort Demolition news : शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई सुरू झाली आहे. दापोली (Dapoli) इथं ही कारवाई सुरू असून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या कारवाईचे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

अनिल परब (Anil Parab) व सदानंद कदम (Sadanand Kadam) यांनी सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन करून दापोलीतील मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर साई रिसॉर्ट बांधल्याचा आरोप होता. हे रिसॉर्ट बांधताना २०० मीटरच्या आत बांधकाम केल्याचा आक्षेप होता. या प्रकरणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी १४ नोव्हेंबर २०२२ रोजी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीत जाऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर काल अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप केले होते. सोमय्या यांनी रामदास कदम यांच्या घोटाळ्याच्या विरोधातही आवाज उठवावा आणि ईडी चौकशीची मागणी करावी, असं अनिल परब म्हणाले होते. तसंच, येत्या काळात रामदास कदम यांचे १२ ते १३ घोटाळे बाहेर काढू, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज परब यांच्याच रिसॉर्टवर कारवाई झाली आहे.

अनिल परब यांनी काय केले होते आरोप?

अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. रामदास कदम यांनी आपल्या पदांचा गैरवापर करून खेड नगरपालिकेचा भूखंड हडपल्याचा आरोप परब यांनी केला होता. या गैरव्यवहाराची कागदपत्रंच अनिल परब यांनी दाखवली. तसंच, खेडमधील जांबुर्डे गावात जमीन भूसंपादन करण्यात आलं होतं. त्या गावात रामदास कदम यांच्या मुलांची १५ गुंटे जागा होती. ह्यांनी सरकारकडून १८.५ गुंट्याचा मोबदला वसूल केला. संपादन केल्यानंतर तोच प्लॉट एनए करण्याची परवानगी त्यांनी मागितली. भूसंपादन झालेली जमीन एनए करण्याची परवानगी कशी काय मागितली जाऊ शकते,' असा सवाल अनिल परब यांनी केला होता. येत्या काही दिवसांत आणखी १२ ते १३ घोटाळे उघड करेन, असा इशाराही परब यांनी केला.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या