मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Loksabha Election 2024 : ‘लोकसभा निवडणुकीत अंधश्रद्धेतून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हा’

Loksabha Election 2024 : ‘लोकसभा निवडणुकीत अंधश्रद्धेतून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हा’

Apr 11, 2024, 07:25 PM IST

  • Superstition In Election : लोकसभा निवडणुकीत अंधश्रद्धेचा (Superstition) वापर करून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हा. त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

अंधश्रद्धेतून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हा

Superstition In Election : लोकसभा निवडणुकीत अंधश्रद्धेचा (Superstition) वापर करून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हा. त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

  • Superstition In Election : लोकसभा निवडणुकीत अंधश्रद्धेचा (Superstition) वापर करून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हा. त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकांच्या लढती अत्यंत अटीतटीच्या होत आहेत. त्यामुळे काही उमेदवार हे प्रतिस्पर्धी उमेदवार व मतदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धेचे प्रकार करतात. लोकसभा निवडणुकीत अंधश्रद्धेचा (Superstition) वापर करून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हा आहे तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग आहे, असे अघोरी प्रकार करणाऱ्यावर पोलिस प्रशासनाने जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Maharashtra Superstition Eradication Committee ) कार्यकर्ते मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात, फारुख गवंडी, डॉ.‌संजय निटवे यांनी  एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

मतदारांच्या मनात अंधश्रद्धेची भीती निर्माण करणाऱ्या या प्रकारांमध्ये नारळावर हात ठेवून विशिष्ट व्यक्तीला मत देण्याची शपथ घ्यायला लावणे, देवाचा भंडारा- अंगारा उचलून मत देण्याविषयी शपथ घ्यायला लावणे,जवळच्या प्रसिद्ध देवस्थानावर मतदारांना घेऊन जाऊन पुजाऱ्याकडून शपथ घ्यायला लावणे,मांत्रिक- तांत्रिकांना गावामध्ये बोलावून महिला मतदारांवर दबाव निर्माण करणे, धर्मगुरूंना बोलावून मतदारांच्यावर प्रभाव टाकणे, विरोधी उमेदवाराच्या अंगणात काळी बाहुली, लिंबू मिरची, नारळ याचा उतारा टाकणे. विरोधी उमेदवारावर तथाकथित काळी जादू-करणीचा प्रकार करणे असे निखळ अंधश्रद्धेचे अनेक प्रकार सध्या निवडणूक काळात घडत आहेत. 

मतदारांवर दबाव टाकण्यात येत असल्याने हे प्रकार आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे आहेत तसेच जादूटोणा विरोधी कायद्यानुसार देखील असे प्रकार करून दहशत निर्माण करणे हा गुन्हा आहे असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मत आहे.

निवडणूक काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे अशा अनेक तक्रारी येतात. निवडणूक काळात कोठे मतदारांवर दबाव टाकण्यासाठी अंधश्रद्धेचे प्रकार आढळल्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क करावा असे आवाहन अंनिस च्या वतीने मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात, फारुख गवंडी, डॉ.‌संजय निटवे, व्ही.वाय.आबा पाटील, प्रा. एस.के.माने, गीता ठकार, सुनील भिंगे, वाघेश सांळुखे, रवि सांगोलकर, सचिन करगणे,अमर खोत यांनी केले आहे.

शारीरिक हिंसेपेक्षा वैचारिक हिंसा अधिक धोकादायक - तुषार गांधी 

सध्या समाजात शारिरिक हिंसे सोबत वैचारिक हिंसा वाढत चालली आहे. शारीरिक हिंसेपेक्षा वैचारिक हिंसा अधिक धोकादायक आहे असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले. ते प्राणीमित्र शिवलाल शहा आणि स्नेहालय यांच्या वतीने भगवान महावीर जयंती निमित्त काल सोलापूर येथील हुतात्मा स्मारक सभागृहात आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या