ठाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरात अंधश्रद्धेतून एका आईने पोटच्या १८ महिन्यांच्या मुलीचा बळी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या अंगात सैतानाचा वास असल्याचे म्हणत तिच्या आई-वडिलांनी तिला स्मशानात घेऊन संपवलं. या प्रकरणी पोलिसांनी चिमुकलीच्या आई-वडिलांना अटक केली आहे. या प्रकाराने मुंब्रा हादरलं आहे.
पोलिसांनी दिलेलेल्या माहितीनुसार, ठाण्याजवळील मुंब्रा येथे आईने पोटच्या बाळाची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अघोरी कृत्यासाठी आईवडिलांनी आपल्या १८ महिन्यांच्या मुलीचा स्मशानात नेऊन हत्या केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी अघोरी कृत्य करत होते. बाळाच्या अंगात सैतानाचा वास असल्याचे म्हणत आईने आपल्या १८ महिन्यांच्या बाळाला स्माशानभूमीत नेले. तेथे काही मंत्र-तंत्र म्हणत निर्दयीपणे १८ महिन्याच्या बाळाची हत्या केली. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
१८ महिन्याच्या बाळाची हत्या केल्याचा हा सगळा प्रकार एका निनावी पत्रामुळे उघड झाला आहे. पोलिसांना एक निनावी पत्र सापडलं होतं. या पत्राच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता हा चक्रावणारा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी आरोपी आई-वडिलांना ताब्यात घेतलं.
सुरुवातीला दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने तिची हत्या केल्याचे सांगितले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. बाळाच्या अंगात सैतान येत होता. त्यामुळे मुलीची हत्या केल्याचं त्यांनी सांगितलं. मुंब्रा पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवासी महिलेचा विनंयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीला गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी अटक केली. आरोपी सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील नीलम फूड कॅन्टीनमध्ये काम करतो. त्याने पीडित महिलेला रेल्वे अधिकारी असल्याचे सांगून महिलेशी गैरवर्तन केले. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. पीडित महिला आणि तिचा पती सोमवारी रात्री सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोहोचले. आरोपीने तपासणीच्या नावाखाली महिलेला नको त्या ठिकाणी स्पश करून तिचा विनयभंग केला.
संबंधित बातम्या