मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai CSMT : रेल्वे अधिकारी असल्याचे सांगून प्रवासी महिलेचा लैंगिक छळ, मुंबईतील सीएसएमटी स्थानकावरील घटना

Mumbai CSMT : रेल्वे अधिकारी असल्याचे सांगून प्रवासी महिलेचा लैंगिक छळ, मुंबईतील सीएसएमटी स्थानकावरील घटना

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 11, 2024 12:25 PM IST

Mumbai CSMT Railway Station: मुंबईच्या सीएसएमटी रेल्वेस्थानकावर प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकावर प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकावर प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली. (HT_PRINT)

Mumbai News: मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवासी महिलेचा विनंयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीला गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी अटक केली. आरोपी सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील नीलम फूड कॅन्टीनमध्ये काम करतो. त्याने पीडित महिलेला रेल्वे अधिकारी असल्याचे सांगून महिलेशी गैरवर्तन केले. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. पीडित महिला आणि तिचा पती सोमवारी रात्री सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोहोचले.त्यांची ट्रेन मंगळवारी पहाटे मध्यरात्रीनंतर निघणार होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

मुरलीलाल मुकुंदलाल गुप्ता (वय,३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सीएसएमटी रेल्वेकावर पीडित महिलेला पाहून आरोपी त्यांच्याजवळ गेला. त्यानंतर आरोपीने त्याच्या जवळील रेल्वेने जारी केलेले ओळखपत्र दाखवून पीडिताला रेल्वे अधिकारी असल्याचे सांगितले. रेल्वे स्थानकावर नियमित तपासणी सुरू असून त्यांची तपासणी करायची असल्याचे आरोपीने सांगितले. आरोपीने पीडिताच्या पतीला ताबडतोब तपासणीसाठी पुरुषांच्या प्रतीक्षा कक्षात जाण्यास सांगितले आणि तिला आपल्यासोबत प्लॅटफॉर्म क्रमांक ११ येथे घेऊन गेला.

Mumbai News : गुढीपाडव्यादिवशी दुर्दैवी घटना, विरारमध्ये सेफ्टी टँकमध्ये बुडून चार मजुरांचा मृत्यू

पुढे आरोपीने पीडिताला तिचे तपासणी करायला सुरुवात केली. त्यानंतर तो तपासणीच्या बहाण्याने पीडिताच्या अंगाला अयोग्य स्पर्श करू लागला. यानंतर पीडिताने त्याची विचारपूस केली असता तो तिथून पळून गेला. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी तिचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर रेल्वे फलाटावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याला २ तासानंतर आरोपीला अटक केली.

Ahmednagar : विहिरीत पडलेल्या मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, अहमदनगर येथील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची झारखंडची आहे. ती तिच्या पतीसह कामानिमित्त मुंबईत आली होती. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.

Mumbai: मुंबईत चोरी करून विमानानं गाव गाठायचा, आसाम येथील फ्लाईंग चोर 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात

प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी महिलेने पोटच्या २ मुलींचा घेतला जीव

रायगड जिल्ह्यात अनैतिक संबंधातून एका महिलेने पोटच्या दोन मुलींची हत्या केली. प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी महिलेने असे कृत्य केल्याची कबूली दिली. दोन्ही मृत मुली प्रेमात अडसर ठरत असल्याने महिलेने टॉवेलने तोंड दाबून त्यांची हत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग