Viral Video : रील्स बनवण्यासाठी व ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असतात. सध्या असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ते पाहून लोक थक्क होतात. अनेक लोक ट्रेन व मेट्रो रेल्वेतही स्टंट करत रील्स बनवत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की, लाल साडी परिधान करून एक मुलगी रेल्वे स्टेशनवर उभी आहे व अचानक डान्स करू लागते. मुलीच्या पाठीमागे एक महिला चालत येताना दिसते. ही महिलाही डान्समध्ये मुलीहून कमी नाही. मुलीच्या पाठीमागे महिलेने असा काही भन्नाट डान्स केला की, व्हिडिओ व्हायरल झाला.
व्हिडिओमध्ये दिसते की, एक तरुणी लाल साडी परिधान करून रेल्वे स्टेशनवर डान्स करू लागते. बॅकग्राउंडमध्ये खेसारी लाल यादव यांचे भोजपुरी गाणे वाजत आहे. मुलीच्या पाठीमागे एक महिला खांद्याला बॅग लटकावून येत आहे, व तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर kajal_bhardwaj_07 नावाच्या अकाउंटवरून शेअर केला आहे.
रेल्वे स्टेशनच्या एका प्लॅटफार्मावर महिला व तरुणी डान्स करत असताना दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून ट्रेन जात आहे. प्रवासीही दोन महिलांचा डान्स पाहात आहेत. शेअर केलेला हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. जर १५ हजाराहून अधिक लोकांना लाईक केला आहे. या व्हिडिओवर शेकडो लोकांनी कमेंट केली आहे.
एका यूजरने लिहिले की, ट्रेन सुटेल काकू, रील परत बनवा. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, वाटते माय-लेकीची जोडी डान्स करत आहे. अन्य एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, आंटीने कमाल केली आहे. व्हायरल होण्यासाठी लोक कोठेही व्हिडिओ बनवत आहेत. काही लोक तर जीव धोक्यात घालून व्हिडिओ बनवत आहेत.
संबंधित बातम्या