मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Holi special trains : होळीला घरी जाणे होणार सोपे! मुंबई-पुण्यातून बिहारसाठी ५ विशेष गाड्या, वाचा तपशील

Holi special trains : होळीला घरी जाणे होणार सोपे! मुंबई-पुण्यातून बिहारसाठी ५ विशेष गाड्या, वाचा तपशील

Mar 11, 2024, 07:39 AM IST

    • Holi special trains for Bihar : होळीच्या (holi festival) दिवशी बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने ५ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व गाड्या मुंबई-पुणे ते बिहारपर्यंत धावतील. समस्तीपूर आणि मुझफ्फरपूर मार्गावर प्रत्येकी एक रेल्वे सोडण्यात येणार आहे.
होळीला घरी जाणे होणार सोपे! मुंबई-पुण्यातून बिहारसाठी ५ विशेष गाड्या, वाचा तपशील

Holi special trains for Bihar : होळीच्या (holi festival) दिवशी बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने ५ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व गाड्या मुंबई-पुणे ते बिहारपर्यंत धावतील. समस्तीपूर आणि मुझफ्फरपूर मार्गावर प्रत्येकी एक रेल्वे सोडण्यात येणार आहे.

    • Holi special trains for Bihar : होळीच्या (holi festival) दिवशी बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने ५ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व गाड्या मुंबई-पुणे ते बिहारपर्यंत धावतील. समस्तीपूर आणि मुझफ्फरपूर मार्गावर प्रत्येकी एक रेल्वे सोडण्यात येणार आहे.

Holi special trains for Bihar : होळी हा संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. राज्यातून बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी संख्या देखील मोठी असते. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने बिहारसाठी विशेष गद्य सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या पुणे आणि मुंबई येथून सोडण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

पाच जोड्या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. यापैकी प्रत्येकी एक जोडी दानापूर आणि मुझफ्फरपूर ते पुणे आणि दानापूर, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूर येथून मुंबईसाठी धावणार आहे.

Maharashtra Weather update : राज्याच्या हवामानात होणार 'हा' मोठा बदल; पुढील काही दिवस असे असेल हवामान

पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, वीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, ०१४०९ लोकमान्य टिळक-दानापूर सुपरफास्ट विशेष ट्रेन लोकमान्य टिळक येथून २३, २५ आणि ३० मार्च रोजी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ५ वाजता दानापूरला पोहोचेल. ०१०४३ लोकमान्य टिळक-समस्तीपूर सुपरफास्ट विशेष गाडी लोकमान्य टिळक येथून २१ आणि २८ मार्च रोजी दुपारी १२. १५ वाजता सुटेल आणि समस्तीपूरला दुसऱ्या दिवशी रात्री १०.१५ वाजता पोहोचेल. तर ०५२८१ मुझफ्फरपूर-लोकमान्य टिळक विशेष गाडी २० मार्च ते ३ एप्रिल दरम्यान दर बुधवारी मुझफ्फरपूर येथून १ वाजता सुटेल आणि गुरुवारी रात्री १०.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनल येथे पोहोचेल.

Oscars 2024 Winners: कुणी मारली ऑस्कर २०२४च्या शर्यतीत बाजी? पाहा यंदाच्या ऑस्कर विजेत्यांची यादी!

ट्रेन क्रमांक ०५२८९ मुझफ्फरपूर-पुणे सुपरफास्ट एसी स्पेशल मुझफ्फरपूर येथून २३ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान दर शनिवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि सोमवारी पुण्याला ५. ३५ वाजता पोहोचेल. ०११०५ पुणे-दानापूर विशेष गाडी पुण्याहून १७ आणि २४ मार्च रोजी ४.१५ वाजता सुटेल आणि दानापूरला दुसऱ्या दिवशी १० वाजता पोहोचेल.

कोकणात जाण्यासाठी देखील विशेष गाड्या

कोकणात शिमगोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले असून या मुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. कोकण रेल्वेने अहमदाबाद - मडगाव, एलटीटी - थिविम, पनवेल - सावंतवाडी, उधना - मंगळुरू, सुरत - करमळी होळी विशेष गाड्या या मार्गावर धावणार आहेत.

पुढील बातम्या