
Maharashtra Weather Update: राज्याच्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. गेल्या आठवड्यात राज्यावर असलेले अवकाळी पावसाचे ढग सध्या दूर झाले आहे. राज्यातून थंडी देखील हळू हळू गायब होत असून उकाडा वाढत आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानात ३५ ते ३६ च्या पुढे गेले आहे. येत्या २४ तासांमध्ये राज्यातील वातावरण कोरडे राहणार असून आकाश निरभ्र राहणार आहे. १२ तारखेनंतर किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर सध्या हवामानाची कुठलीही खास यंत्रणा नाही. एक द्रोणीका रेषा पूर्व विदर्भ ते ओडिषा पर्यंत आहे. तसेच प्रती चक्रवातामुळे काही प्रमाणात आद्रता राज्याच्या आग्नेय भागापर्यंत उपलब्ध आहे. यामुळे सध्या राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. १२ तारखेपर्यंत किमान तापमानात किरकोळ वाढ तर १३ तारखेनंतर किंचित घट अपेक्षित आहे. या काळात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही.
राज्यात काही ठिकाणी अजूनही ढगाळ वातावरण तयार कायम आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. पश्चिमी विक्षोभामुळे येणाऱ्या आर्द्रतेमुळे काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. मात्र, उन्हाचा चटका वाढला असून उकाडाही वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे.
पुणे व परिसरात हवामान कोरडे राहण्याचा व किमान तापमानात १२ तारखेपर्यंत किरकोळ वाढ तर १३ तारखेनंतर दोन ते तीन दिवस किरकोळ घट होण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमानात विशेष बदल अपेक्षित नाही.
राज्यात रविवारी तापमानात वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. सोलापूरला राज्यातील सर्वाधिक तापमान होते. ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद या ठिकाणी झाली. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये पुढील दोन-तीन दिवस अवकाळी पावसाची आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राजधानी दिल्लीत देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात या वर्षी सर्वाधिक उन्हाळा राहणार आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे. अल निनो मे अखेरपर्यंत सक्रिय राहणार असल्यामुळे, य यावर्षी तापमानात मोठी वाढ होणार आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे.
संबंधित बातम्या
