Oscars 2024 Winners List In Marathi: जगातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ऑस्कर अवॉर्ड्स २०२४’ हा पुरस्कार सोहळा आज (११ मार्च) पार पडत आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे ९६व्या अकादमी पुरस्कारांचे वितरण होत आहे. भारतीय वेळेनुसार हा सोहळा आज ११ मार्च रोजी पहाटे 4 वाजता सुरू झाला आहे. नुकतीच या पुरस्कार विजेत्यांची यादी समोर आली आहे. आज म्हणजेच ११ मार्च रोजी रात्री ८ वाजता अकादमी अवॉर्ड्सचे रिपीट टेलिकास्ट स्टार मुव्हीजवर देखील केले जाणार आहे.
बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस- डा'वाइन जॉय रैंडोल्फ (द होल्डओवर्स)
बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट- वॉर इज़ ओव्हर
बेस्ट अॅनिमेटेड फीचर- द बॉय अँड द हेरॉन
बेस्ट अॅडेप्टेड स्क्रीनप्ले कॅटेगरी- अमेरिकन फिक्शन
बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले- अॅनाटॉमी ऑफ ए फॉल (जस्टिन ट्रिट आणि ऑर्थर हरारी)
बेस्ट मेकअप अँड हेयरस्टाइलिंग- पुअर थिंग्स
बेस्ट प्रोडक्शन डिझाइन- पुअर थिंग्स (डिझायनर जेम्स प्राइस आणि शोना हीथ)
बेस्ट कॉस्ट्यूम कॅटेगरी- पुअर थिंग्स
बेस्ट इंटरनॅशनल फीचर- द ज़ॉन ऑफ़ इंटरेस्ट (जोनाथन ग्लेज़र)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर- रॉबर्ट डाउनी ज्युनिअर (ओपेनहायमर)
बेस्ट व्हिज़ुअल इफ़ेक्ट- गॉडज़िला मायनस वन
बेस्ट फिल्म एडिटिंग- ओपेनहायमर
बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट- द लास्ट रिपेयर शॉप
बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर- २० डेज इन मारियुपोल
बेस्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट- द वंडरफुल लाईफ ऑफ हेनरी शुगर
बेस्ट सिनेमॅटोग्राफी - डच-स्वीडिश सिनेमॅटोग्राफर होयटे वॅन होयटेमा (ओपेनहायमर)
बेस्ट ओरिजनल स्कोर- लुडविग गोरान्सन (ओपेनहायमर)
बेस्ट ओरिजनल साँग- व्हाट वॉज आय मेड फॉर? (बॉर्बी)
बेस्ट अॅक्टर- सिलियन मर्फी (ओपेनहायमर)
बेस्ट अॅक्ट्रेस- एम्मा स्टोन (बार्बी)
बेस्ट डायरेक्टर- ख्रिस्तोफर नोलन (ओपेनहायमर)
बेस्ट फिल्म- ओपेनहायमर
झारखंडमधील बलात्कारावर आधारित चित्रपटाला २०२४च्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत नामांकन मिळाले होते. 'टू किल अ टायगर' नावाच्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर फिल्म श्रेणीत समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, या चित्रपटाचे अकादमी पुरस्कार जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. हा पुरस्कार '२० डेज इन मारियुपोल' या चित्रपटाने पटकावला आहे. निशा पाहुजा दिग्दर्शित झारखंडच्या कथेवर आधारित ‘टू किल अ टायगर’ हा कॅनेडियन चित्रपट आहे.