मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pune Expressway Bus Fire: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, ४२ जण थोडक्यात बचावले

Mumbai Pune Expressway Bus Fire: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, ४२ जण थोडक्यात बचावले

Apr 21, 2024, 09:54 AM IST

    • Bus Catches fire on Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर बस अचानक पेटल्याने परिसरात खळबळ माजली.
लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बसला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आग लागली.

Bus Catches fire on Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर बस अचानक पेटल्याने परिसरात खळबळ माजली.

    • Bus Catches fire on Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर बस अचानक पेटल्याने परिसरात खळबळ माजली.

Bus Fire News: लग्नाचे वऱ्हाड मुंबईहून सोलापूरला जात असताना बसला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग लागली. आज मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बस अक्षरक्ष: जळून खाक झाली. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४२ जणांचे प्राण वाचले.

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Virar Accident: विरारमध्ये पाण्याच्या टँकरच्या धडकेत पाच वर्षांचा नातू आणि आजीचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त बस लग्नाचे वऱ्हाड घेऊन मुंबईहून सोलापूरच्या दिशेने जात होते. मात्र, मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने लगेच बसमधील सगळ्यांना खाली उतरण्यास सांगितले. काही क्षणातच बसने पेट घेतला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बस पूर्ण जळून खाक झाली. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. ही आग कशामुळे लागली अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Mumbai Building Portion Collapses: मुंबईतील दुमजली इमारतीचा काही भाग कोसळला, ३ जण जखमी

या आगीच्या घटनेने वाहतुकीवर परिणाम झाला. परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. या घटनेचा व्हिडिओ अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेने लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाड्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

मुंबई: महालक्ष्मी मंदिराजवळ भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं!

मुंबईतील महालक्ष्मी मंदिराजवळ शनिवारी (१९ एप्रिल २०२४) एका भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना उडवल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात दोन्ही मुली जखमी झाल्या. त्यांना त्वरीत नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अल्पवयीन मुली रस्ता ओलांडताना दिसत आहेत. त्याच क्षणी पिवळ्या रंगाच्या एका भरधाव कारने त्यांना जोरात धडक दिली आणि दोन्ही मुली रस्त्यावर खाली पडण्यापूर्वी हवेत उंच फेकल्या गेल्या. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या