Virar Accident: विरारमध्ये पाण्याच्या टँकरच्या धडकेत पाच वर्षांचा नातू आणि आजीचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Virar Accident: विरारमध्ये पाण्याच्या टँकरच्या धडकेत पाच वर्षांचा नातू आणि आजीचा मृत्यू

Virar Accident: विरारमध्ये पाण्याच्या टँकरच्या धडकेत पाच वर्षांचा नातू आणि आजीचा मृत्यू

Apr 21, 2024 07:20 AM IST

Virar Accident News: विरारमध्ये पाण्याच्या टँकरच्या धडकेत पाच वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या ७५ वर्षीय आजीचा मृत्यू झाला आहे.

विरारमधील ग्लोबल सिटी परिसरात टँकरच्या धडकेत पाच वर्षाचा नातू आणि त्याच्या आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विरारमधील ग्लोबल सिटी परिसरात टँकरच्या धडकेत पाच वर्षाचा नातू आणि त्याच्या आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Virar Water Tanker Accident: पाण्याच्या टँकरच्या धडकेत पाच वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या ७५ वर्षीय आजीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी विरारमध्ये घडली. मयत ग्लोबल सिटी परिसरातील रहिवासी आहेत. याप्रकरणी अज्ञात टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. टँकरचालकाने बेदरकारपणे वाहन चालविल्याने रहिवाशांचा मृत्यू झाल्याची विरारमधील महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.

टँकरच्या धडकेत मुलगा आणि त्याची आजी दोघेही खाली पडले आणि गंभीर जखमी झाले, असे प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. तिथून जाणाऱ्यांनी दोघांना संजीवनी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी पाच वर्षांच्या मुलाला मृत घोषित केले. तर त्याच्या आजीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.

Unseasonal Rain : कोकण, पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस; वीज पडून चिमुकलीचा मृत्यू

नागरिकांनी टँकरचालकाला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने गाडी घटनास्थळी सोडून तिथून पसार झाला. आजी त्यांच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शाळेतून नातूला सोडायला आणि आणायला जायची. या घटनेनंतर अज्ञात वाहनचालकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अ अन्वये निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती अर्नाळा पोलिस ठाण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

Mumbai Accident : मुंबईतील महालक्ष्मी मंदिराजवळ भीषण अपघात; भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं!

चालकाची ओळख पटविण्यासाठी पोलिस टँकरच्या मालकाशी संपर्क साधत आहेत. टँकरचालकांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे सांगत या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. वसई-विरार परिसरातील वाढती लोकसंख्या आणि पाणीटंचाईमुळे बहुतांश रहिवासी सोसायट्या पाणीपुरवठ्यासाठी टँकरचा पर्याय निवडतात. दिवसभरात २०० ते ३०० टँकर रस्त्यावर धावत असून वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. महिनाभरात टँकरचा अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे.

टँकरच्या धडकेत पत्नीच मृत्यू, पती गंभीर जखमी

९ एप्रिल रोजी भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर, तिचा पती गंभीर जखमी झाला. विरार पश्चिमेकडील जकात चौकीवर बुधवारी सकाळी हा अपघात झाला. बेदरकारपणे वाहन चालवून निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी टँकरचालकाला अटक केली होती. विरारमधील भाटपाडा येथे राहणारे जितेंद्र टाक (वय ४०) हे पत्नी किरण टाक (वय ३५) यांच्यासह दुचाकीवरून विरार स्थानकाकडे जात असताना हा अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. जितेंद्रचे डोके दुभाजकावर आदळले, तर किरण टँकरच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर