मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wagh Nakh : अफझलखान वधासाठी शिवरायांनी वापरलेली वाघनखं भारतात आणली जाणार

Wagh Nakh : अफझलखान वधासाठी शिवरायांनी वापरलेली वाघनखं भारतात आणली जाणार

Sep 08, 2023, 04:01 PM IST

  • Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : स्वराज्य स्थापनेच्या वेळी मुघलांविरुद्ध झालेल्या संघर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये वापरलेली वाघनखं लवकरच भारतात येणार आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : स्वराज्य स्थापनेच्या वेळी मुघलांविरुद्ध झालेल्या संघर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये वापरलेली वाघनखं लवकरच भारतात येणार आहेत.

  • Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : स्वराज्य स्थापनेच्या वेळी मुघलांविरुद्ध झालेल्या संघर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये वापरलेली वाघनखं लवकरच भारतात येणार आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : स्वराज्यावर चालून आलेला विजापूरच्या आदिलशहाचा सरदार अफझाल खान याचा वध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये वापरलेली वाघनखं लवकरच भारतात आणली जाणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

पुणे (Pune) जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. सप्टेंबर महिन्याच्या अखेरील या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी लंडनला भेट देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही वाघनखं सध्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये प्रदर्शनास आहेत. या म्युझियमशी महाराष्ट्र सरकार करार करणार आहे, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.

ठरल्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पार पडल्यास याच वर्षी ही वाघनखं भारतात येतील. ब्रिटननं ही वाघनखं परत करण्याचं मान्य केलं आहे. तसं पत्र राज्य सरकारला आलं आहे. शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी अफझलखानाला मारले, त्याच तिथीला ही वाघनखं भारतात आणली जातील. इतर काही तारखांचाही विचार करण्यात येत असून वाघनखं नेमकी कशी आणायची, याचंही नियोजन केलं जात आहे, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.

‘सर्व शिवकालीन वस्तू एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ब्रिटननं वाघनखं देण्याची तयारी दर्शवली आहेच, पण शिवरायांची 'भवानी' तलवार देखील परत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत’, असं मुनगंटीवार म्हणाले.

'छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं हा इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. राज्यातील जनतेच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. या ठेव्याचं हस्तांतरण अत्यंत जबाबदारीनं व काळजीपूर्वक व्हावं असाही सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुनगंटीवार यांच्यासह सांस्कृतिक खात्याचे प्रधान सचिव डॉ. विकास खारगे, राज्याच्या पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे हे लंडन भेटीवर जाणार आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या