मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  G 20 Summit India Live : आफ्रिकन युनियनला मिळालं G20 चे सदस्यत्व, पंतप्रधान मोदींकडून आर्थिक कॉरिडॉरची घोषणा
G 20 Summit India
G 20 Summit India

G 20 Summit India Live : आफ्रिकन युनियनला मिळालं G20 चे सदस्यत्व, पंतप्रधान मोदींकडून आर्थिक कॉरिडॉरची घोषणा

Ganesh Pandurang Kadam 04:00 PM ISTSep 09, 2023 09:30 PM
  • twitter
  • Share on Facebook

G 20 Summit in new delhi Live Updates : आफ्रिकन युनियन आता जी२०परिषदेचा कायमचा सदस्य असेल,अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.

Sat, 09 Sep 202304:00 PM IST

भारत आणि ब्रिटनदरम्यान अर्थ व्यापार मैत्री वृद्धिंगत होणार

भारत आणि ब्रिटनदरम्यान आर्थिक देवाणघेवाण तसेच द्विपक्षिय मैत्री अधिक वृद्धिंगत करण्याविषयी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक दरम्यान चर्चा. 

Sat, 09 Sep 202302:24 PM IST

पंतप्रधानांकडून भारत-मध्य-पूर्व-युरोप मेगा आर्थिक कॉरिडॉरची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज India-Middle East-Europe Economic Corridor ची घोषणा केली. या कॉरिडॉरमुळे जी २० परिषदेतील सहभागी देशांतर्गत कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांना बळ मिळणार आहे.

Sat, 09 Sep 202302:19 PM IST

Video: नवी दिल्लीत जागतिक नेत्यांची मांदियाळी

G 20 संमेलनात उपस्थित राहण्यासाठी जगभरातून आलेल्या जागतिक नेत्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं.

Sat, 09 Sep 202310:57 AM IST

G20 मध्ये सेल्फी सेल्फी... 

G20 बैठकीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि मुलगी सायमा वाजेद यांची भेट झाली. भेटीनंतर बायडेन यांनी असा एक सेल्फी काढला.

Sat, 09 Sep 202310:31 AM IST

G 20- नवी दिल्ली घोषणापत्रावर एकमत

G 20 बैठकीनिमित्त जारी करण्यात येणाऱ्या ‘नवी दिल्ली घोषणापत्रावर’ सदस्य राष्ट्रांचं एकमत झालं असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. 

Sat, 09 Sep 202310:18 AM IST

आफ्रिकन युनियनला मिळालं G20 चे सदस्यत्व, पंतप्रधान मोदींची घोषणा

आफ्रिकन युनियन आता जी २० परिषदेचा कायमचा सदस्य असेल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. ५५ राष्ट्रांचा समूह असलेल्या आफ्रिकन युनियनचा समावेश दिल्लीतील बैठकीचं सर्वात ठळक वैशिष्ट्य असेल. पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सन्मानानं आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांना बैठकीत समाविष्ट केलं.

Sat, 09 Sep 202310:03 AM IST

G20 Summit: पंतप्रधान मोदींची ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक

 

भारताचे पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे मुद्द्यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

Sat, 09 Sep 202310:01 AM IST

G 20 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट

जी २० देशांच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यादरम्यान विविध मुद्यांवर द्विपक्षीय चर्चा झाली.

Fri, 08 Sep 202303:40 PM IST

G-20 in India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दिल्लीत, पंतप्रधान मोदींची घेतली भेट

G20 Summit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधानाच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेतली. जिथे दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांमधील ही भेट सुमारे तासभर चालली.अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.

 

Fri, 08 Sep 202312:37 PM IST

G20 Summit: ‘वसुधैव कुटुंबकम’ थीमवर ब्रिटीश पंतप्रधान ऋषी ​​सुनकची प्रतिक्रिया

 

"मला वाटते की हा एक चांगला विषय आहे.यूकेमध्ये माझ्यासारखे सुमारे दोन दशलक्ष भारतीय वंशाचे आहेत. त्यामुळे, ब्रिटिश पंतप्रधान म्हणून हे माझ्यासाठी खूप खास आहे”, अशी ब्रिटीश पंतप्रधान ऋषी ​​सुनकची प्रतिक्रिया दिली.

Fri, 08 Sep 202310:30 AM IST

G20 Summit : जी २० परिषदेशी संबंधित बैठका देशातील ६० शहरांत झाल्या - अमिताभ कांत

G20 Summit : जी २० शिखर परिषदेशी संबंधित तब्बल २२० बैठका देशभरातील ६० शहरांमध्ये घेण्यात आल्या आहेत. भारताची वैविध्यता आणि संघराज्य पद्धतीचं हे द्योतक आहे, असं G20 शेर्पा अमिताभ कांत यांनी सांगितलं.

Fri, 08 Sep 202308:57 AM IST

Rishi Sunak : मी भारताचा जावई, माझ्यासाठी ही शिखर परिषद खास - ऋषी सुनक 

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं आज जी २० परिषदेसाठी नवी दिल्लीत आगमन झालं. मी भारताचा जावई असल्यानं ही परिषद माझ्यासाठी खास आहे, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी मीडियाशी बोलताना केली. ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांनी प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती यांच्याशी विवाह केला आहे.

Fri, 08 Sep 202306:49 AM IST

HD Deve Gowda : जी २० डिनरला उपस्थित राहणार नाही; माजी पंतप्रधान देवेगौडा यांचं ट्वीट

HD Deve Gowda Tweet on G20 Dinner : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या जी २० डिनरला उपस्थित राहणार नसल्याची माहिती माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. प्रकृतीच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. सरकारला याबाबत कळवल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जी २० परिषद प्रचंड यशस्वी व्हावी, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Fri, 08 Sep 202305:16 AM IST

G20 Summit PM Modi : जगातील विविध नेत्यांसोबत पंतप्रधान मोदींच्या १५ हून जास्त द्विपक्षीय बैठका

PM Modi bilateral meetings : जी २० परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जगातील विविध नेत्यांसोबत १५ हून अधिक द्विपक्षीय बैठका होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी तीन बैठका शनिवार, ८ सप्टेंबर रोजी अमेरिका, बांगलादेश व मॉरिशसच्या पंतप्रधानांसोबत होतील. तर, चार बैठका ९ सप्टेंबर रोजी ब्रिटन, जपान, जर्मनी आणि इटली यांच्या नेत्यांसोबत होतील. तर, उर्वरीत आठ बैठका १० सप्टेंबर रोजी होतील. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत पंतप्रधान मोदी लंच घेतील. त्याचवेळी चर्चाही करतील.

Fri, 08 Sep 202304:36 AM IST

G20 Summit Live: अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस G20 शिखर परिषदेसाठी दिल्लीत दाखल

G20 Summit Live: जी २० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस दिल्लीत पोहोचले आहेत. भारतातर्फे त्यांंचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं.

Fri, 08 Sep 202304:26 AM IST

G20 Summit Delhi : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांना राष्ट्रपतींच्या स्नेहभोजनाचं आमंत्रण

Rashtrapati Bhavan G20 Dinner : जी २० शिखर परिषदेत सहभागी होत असलेल्या देशोदेशींच्या नेत्यांसाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आज रात्री स्नेहभोजन आयोजित केलं आहे. या स्नेहभोजनाला भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

Fri, 08 Sep 202304:26 AM IST

Xi Jinping not in G 20 : चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग यांची जी २० परिषदेकडं पाठ

Xi Jinping G 20 : चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग यांनी भारतात होणाऱ्या जी २० शिखर परिषदेकडं पाठ फिरवली आहे. झिनपिंग यांच्या अनुपस्थिती मागील अधिकृत कारण चीननं स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळं तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Fri, 08 Sep 202304:04 AM IST

Vladimir Puntin and G 20 Summit : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन जी २० परिषदेला येणार नाहीत

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारतात होणाऱ्या जी २० परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियानं ही भूमिका घेतली आहे. युक्रेन-रशिया संघर्ष सुरू झाल्यापासून पुतीन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकाही परिषदेला हजेरी लावलेली नाही. जी २० परिषदेतील अनुपस्थितीचा निर्णय देखील याच भूमिकेशी सुसंगत असल्याचं बोललं जातं.

Fri, 08 Sep 202303:57 AM IST

Narendra Modi : नरेंद्र मोदी आज जो बायडन, हसीना शेख यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार

इंडोनेशिया इथं झालेल्या एशियन-इंडिया समिटमध्ये सहभागी होऊन भारतात परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना व मॉरिशसचे पंतप्रधान जुगनाथ यांच्याशी चर्चा करतील. बायडेन यांच्याशी संरक्षण क्षेत्रातील विविध करारांबाबत चर्चा होणार असल्याचं समजतं.

Fri, 08 Sep 202303:54 AM IST

G 20 Summit : जी २० शिखर परिषदेला उद्यापासून सुरुवात, नेते मंडळी दाखल होण्यास सुरुवात

जी २० शिखर परिषद शनिवारपासून दिल्लीत होत आहे. त्या निमित्तानं दिल्लीत जय्यत तयारी करण्यात आली असून जगातील दिग्गज नेते पोहोचू लागले आहेत. या परिषदेत विविध देशाचे ३० नेते व युरोपियन महासंघाचे उच्चस्तरीय अधिकारी सहभागी होणार आहेत. भारतानं त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे.