मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Beed Crime : पैशाच्या वाद टोकाला ! सुट्टीवर आलेल्या जवानाचा सख्ख्या भावाने केला खून; बीडच्या आष्टी येथील घटना

Beed Crime : पैशाच्या वाद टोकाला ! सुट्टीवर आलेल्या जवानाचा सख्ख्या भावाने केला खून; बीडच्या आष्टी येथील घटना

Dec 10, 2023, 01:59 PM IST

    • Beed ashti murder news : बीड जिल्ह्यातील आष्टी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पैशाच्या वादातून एका भावाने सुट्टीसाठी घरी आलेल्या जवानाचा खून केला.
Beed ashti murder news

Beed ashti murder news : बीड जिल्ह्यातील आष्टी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पैशाच्या वादातून एका भावाने सुट्टीसाठी घरी आलेल्या जवानाचा खून केला.

    • Beed ashti murder news : बीड जिल्ह्यातील आष्टी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पैशाच्या वादातून एका भावाने सुट्टीसाठी घरी आलेल्या जवानाचा खून केला.

Beed Ashti murder news : बीड जिल्ह्यातील आष्टी येथील वाघळूज गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पैशाच्या वादातून एका भावाने सीआरपीएफमध्ये जवान असणाऱ्या आपल्या सख्ख्या मोठ्या भावाला बेदम मारहाण करत त्याचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

airport near Tadoba : ताडोबा अभयारण्यालगत विमानतळ उभारण्याला पर्यावरण खात्याचा विरोध; मंत्र्याकडून पुन्हा प्रस्ताव सादर

विनोद विनायक पवार असे आरोपी लहान भवाचे नाव आहे. तर प्रवीण विनायक पवार असे खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. प्रवीण हा झारखंड येथे सीआरपीएफमध्ये जवान आहे. तो पंधरा दिवसांपासून सुट्टीसाठी गावी आला होता.

Ban On Onion Exports : निर्यातबंदीचा फटका! बांग्लादेश सीमेवरून माघारी फिरले कांद्याचे तब्बल २०० ट्रक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण आणि त्यांचा लहान भाऊ विनोद यांच्यात पैशावरून वाद झाला. हा वाद टोकाला गेला. यातुन विनोदने प्रवीणला बेदम मारहाण केली. या मारहाणीत विनोद हा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती ही अंभोरा पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने दवाखान्यात येत पंचनामा केला. प्रवीण यांच्या पत्नी सीमा पवार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी सासू झुंबरबाई पवार, सासरे विनायक पवार, भावजयी सोनाली पवार, दीर विनोद पवार यांच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विनोद पवार याला पोलिसांनी अटक केली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या