मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तुकाराम महाराजांनंतर आता ‘या’ संताबद्दल बागेश्वर बाबांचं वादग्रस्त विधान; नागपूर, भंडाऱ्यात गुन्हा दाखल

तुकाराम महाराजांनंतर आता ‘या’ संताबद्दल बागेश्वर बाबांचं वादग्रस्त विधान; नागपूर, भंडाऱ्यात गुन्हा दाखल

Apr 01, 2024, 09:21 AM IST

  • Bageshwar Dham Baba : बागेश्वर धाम बाबा धीरेंद्र शास्त्री यांची वादग्रस्त (baba joomdevji thubrikar) वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. त्यांनी राज्यातील एका संताबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बागेश्वर बाबांचे वादग्रस्त विधाने थांबेना, 'या' संतांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने, भंडारा, नागपूरमध्ये गुन्हा (HT)

Bageshwar Dham Baba : बागेश्वर धाम बाबा धीरेंद्र शास्त्री यांची वादग्रस्त (baba joomdevji thubrikar) वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. त्यांनी राज्यातील एका संताबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Bageshwar Dham Baba : बागेश्वर धाम बाबा धीरेंद्र शास्त्री यांची वादग्रस्त (baba joomdevji thubrikar) वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. त्यांनी राज्यातील एका संताबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bageshwar Dham Baba controversial statement : बागेश्वर धाम बाबा धीरेंद्र शास्त्री यांची वादग्रस्त (baba joomdevji thubrikar) वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. त्यांनी राज्यातील एका संताबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केले होते. त्यानंतर आता त्यांनी भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथे सुरू असलेल्या सत्संगात मानव धर्माचे संस्थापक बाबा जूमदेवजी ठूब्रिकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे.  या प्रकरणी त्यांच्यावर भंडारा आणि नागपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

LPG Price 1 April : मोठी बातमी! लोकसभा निवडणुकी आधी दिलासा! एलपीजी सिलेंडर ३२ रुपयांनी झाला स्वस्त

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे बागेश्वर धाम बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम सुरू आहे. या प्रवाचनाच्या दरम्यान, रविवारी त्यांनी मानव धर्माचे संस्थापक बाबा जूमदेवजी ठूब्रिकर यांच्याबाबत आक्षेपार्य विधान केले. एवढेच नाही तर त्यांच्यावर टीका देखील केली. त्यांच्या या व्यक्तव्यामुळे जूमदेवजी ठूब्रिकर यांच्या लाखो भविकांच्या आणि सेवकांच्या भावना दुखावल्या असून त्यांनी थेट भंडारा पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली आहे.

Satara news : महाबळेश्वरमध्ये तलावात पोहण्यासाठी गेलेल्या ३ मुली बुडाल्या; दोघींचा मृत्यू तर एकीला वाचवण्यात यश

मात्र, पोलिसांनी त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई केली नसल्याने मोठ्या प्रमाणात ठुब्रीकर यांच्या सेवकांनी मोर्चा काढत मोहाडी पोलिस ठाण्यावर हल्लाबोल केला. यामुळे वातावरण तंग झाले होते. परिस्थिती चिघळल्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवत बंदोबस्त वाढवला. याचे पडसाद नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील उमटले असून ठुब्रीकार यांचे हजारो सेवक यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यामुळे परिस्थिती चिघळूनये म्हणून पोलीस अधीक्षकांनी आयोजक व धिरेंद्र शास्त्री यांच्यावर कलम २९५ अन्तर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बागेश्वर धामचे महंत धिरेंद्र शास्त्री यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याचे पडसाद नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथेही उमटले आहेत. काही सेवकांनी नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यात बागेश्वर बाबाच्या विरोधात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण्यात आली. बाबा जुगदेव हे महानत्यागी असून त्यांच्या भक्ती व कार्यावर टीका केल्याने त्यांच्या अनुयायांनी धिरेंद्र शास्त्री यांचा निषेध करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मोहाडी येथे सध्या तानावाचे वातावरण आहे. धार्मिक भावनेला ठेस पोहचल्याने त्याचे मोहाडी येथे सुरू असलेळे प्रवचन बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या