Three Girls drawan in Mahabaleshwar Shivsagar lake: सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे येथे असलेल्या शिवसागर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुली तलावात बुडाल्या असून यातील दोघींचा मृत्यू झाला तर एकीला वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे वाळणे गावावर शोककळा पसरली आहे.
या घटनेचे वृत्त असे की, सातारा जिल्ह्यातिल महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागातील वाळणे गावात असणाऱ्या शिवसागर जलाशयावर पोहण्यासाठी तीन मुली गेल्या होत्या. या तीन मुली या जलाशयात बुडाल्या. ही घटना ग्रामस्थांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जात तिघींना बाहेर काढले. यातील एकीला जीवंत तर दोघी मुली या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना ग्रामस्थांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, यातील दोन मुलींचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. एका मुलीवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या मुली रविवारी दुपारी ३ च्या सुमारास शिवसागर जलाशयात पोहण्यासाठी गेल्या. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. यामुळे त्या पाण्यात बुडू लागल्या. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेत तिघींना पाण्यातून बाहेर काढले.
त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघींना मृत घोषित केले तर बचवलेल्या एका मुलीवर उपचार सुरू केले आहे. मृत मुली या अल्पवयीन असून या घटनेमुळे तापोळ्यासह वाळणे आणि वेंगळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे.