LPG Price 1 April : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरचे दर कमी करून ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे. तब्बल ३२ रुपयांनी ही कपात करण्यात आली आहे. यामुळे आजपासून दिल्लीत एलपीजी सिलिंडरचे दर ३०.५० रुपयांनी कमी झाले आहेत. तर कोलकात्यात ३२ रुपयांनी, मुंबईत ३१.५० रुपयांनी आणि चेन्नईमध्ये ३०.५० रुपयांनी एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला आहे. केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये एलपीजीचे दर कमी करण्यात आले आहेत. या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
IOC नुसार, दिल्लीत आजपासून १९ किलोचा एलपीजी सिलेंडर १७६४.५० रुपयांना मिळणार आहे. पूर्वी तो १७९५ रुपयांना मिळत होता. कोलकाता येथे हा सिलेंडर आता १९११ रुपयांऐवजी १८७९ रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत १७१७.५० रुपयांना व्यावसायिक सिलेंडर मिळणार आहे. पूर्वी तो १८४९ रुपयांना मिळत होता. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता १९३० रुपयांना मिळणार आहे.
आग्रा, उत्तर प्रदेशमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ८१५.५० रुपये आहे, परंतु आता व्यावसायिक सिलेंडरचा दर कमी होऊन तो १८११.५० रुपयांवर आला आहे. लखनौमध्ये आज घरगुती एलपीजी सिलिंडर ८४०.५० रुपयांना तर व्यावसायिक गॅस सिलिंडर १८७७.५० रुपयांना मिळणार आहे. जयपूर, राजस्थानमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडर ८०६.५० रुपये आहे. दुसरीकडे, १९ किलोचा सिलेंडर आता १७८६.५० रुपयांना मिळणार आहे. मुंबईत ३१.५० रुपयांनी आणि चेन्नईमध्ये ३०.५० रुपयांनी एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला आहे.'
गुरुग्राममध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७७० रुपयांपर्यंत खाली आली आहे. तर, घरगुती सिलिंडरची किंमत ८११.५० रुपयांवर स्थिर आहे. पंजाबमधील लुधियानामध्ये १९ किलोचा निळा सिलेंडर १८३५.५० रुपयांवर आला आहे. येथील घरगुती सिलिंडरचा दर ८२९ रुपये आहे. पाटणा, बिहारमध्येही सिलिंडर स्वस्त झाले आहेत. पाटणामध्ये आजपासून व्यावसायिक सिलेंडर २०३९ रुपयांना मिळेल तर घरगुती सिलिंडर ९०१ रुपयांना मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मार्चमध्ये महिला दिनानिमित्त सरकारने घरगुती सिलिंडरच्या ग्राहकांना मोठी भेट दिली होती. ८ मार्च रोजी सहा महिन्यांत दुसऱ्यांदा एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर एलपीजी सिलिंडरच्या दरात २०० रुपयांनी कपात केल्यानंतर सरकारने ९ मार्च रोजी घरगुती सिलिंडरचे दर १०० रुपयांनी कमी केले. दिल्लीत १४ किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत ८०३ रुपये झाली आहे. आजही याच दराने मिळतो.