मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadanvis : राज्यात नीती आयोगाच्या धर्तीवर उभारणार इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis : राज्यात नीती आयोगाच्या धर्तीवर उभारणार इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sep 18, 2022, 08:54 PM IST

    • Niti Aayog : राज्यात नीती योगाच्या धर्तीवर एक नवी संस्था उभी करण्यात येणार असल्याचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यमांशी बोलतांना सांगितले.
Deputy CM Devendra Fadnavis (ANI Photo/ Rahul Singh) (Rahul Singh)

Niti Aayog : राज्यात नीती योगाच्या धर्तीवर एक नवी संस्था उभी करण्यात येणार असल्याचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यमांशी बोलतांना सांगितले.

    • Niti Aayog : राज्यात नीती योगाच्या धर्तीवर एक नवी संस्था उभी करण्यात येणार असल्याचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यमांशी बोलतांना सांगितले.

मुंबई : राज्यात नीती योगाच्या धर्तीवर एक स्वतंत्र संस्था उभी केली जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन असे या संस्थेचे नाव राहणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकारांना दिली.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नीती आयोगाचे अधिकारी यांची आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. यावेळी नीति आयोगाचे मुख्यकार्यकारी अधिकारी आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. राज्यात नीति आयोगा प्रमाणेच एक संस्था असावी या हेतूने इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ही नवी संस्था उभारली जाणार आहे. या बाबत सरकारतर्फे आम्ही सादरीकरण केले. विविध सेक्टरमध्ये कशाप्रकारे मदत होऊ शकते याबाबत नीति आयोगाने देखील सादरीकरण केले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तत्वत: संमती दिली आहे. त्या नुसार ही संस्था लवकरच उभारली जाणार आहे. ही बाब महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात हा मुद्दा मांडला जाणार असून या बाबत आम्ही निर्णय घेऊ. मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यावर या बाबत माध्यमांना माहिती दिली जाईल असे फडणवीस म्हणाले.

या बैठकीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून हेल्थ केअर आणि कृषी क्षेत्र यामध्ये परिर्वतनाचा कसे करता येईल, मॉनिटाइझेन ऑफ अॅसेट्सचा विषय, ब्लॉक चेन इन अॅग्रीक्ल्चर, ईव्ही पॉलीसी, अपारंपारिक उर्जेचा वापर या सारख्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या सगळ्या विषयांवर नीति आयोगाने अभ्यास आहे. नीति आयोगाने यासाठी एक महत्त्वाचे टूल तयार केले आहे. ज्यामध्ये राज्यातील सर्व विभागात तयार होणारा डेटा एकत्रित करून त्याचे परीक्षण करून निर्णय निर्णय घेता येणार आहे. ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमी या महत्त्वकांक्षी प्रकल्पासंदर्भातही आम्ही नीति आयोगसोबत काम करत आहोत. या सर्व गोष्टी आज चर्चेत आल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी देखील त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी आणि आता झालेल्या पावसाचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न आहे. पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल, त्यांना मदत केली जाईल ही घोषणा मुख्यमंत्री यांनी आधीच केली आहे. आता पुन्हा पाऊस पडला आहे त्यात जर का नवीन क्षेत्र बाधित झालं असेल, तर त्याचे देखील पंचनामे करून मदत केली जाणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या