मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadanvis: मला शेट्टी आडनाव लावायला आवडेल, किमान त्यामुळे तरी दोन-चार हॉटेल तरी नावावर होतील;देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis: मला शेट्टी आडनाव लावायला आवडेल, किमान त्यामुळे तरी दोन-चार हॉटेल तरी नावावर होतील;देवेंद्र फडणवीस

Sep 18, 2022, 05:42 PM IST

    • Devendra Fadanvis : कुर्ला येथे विश्व बंट संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी मी देवेंद्र शेट्टी फडणवीस. मला शेट्टी नाव लावायला आवडेन असे ते म्हणाले.
Deputy CM Devendra Fadnavis (ANI Photo/ Rahul Singh) (Rahul Singh)

Devendra Fadanvis : कुर्ला येथे विश्व बंट संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी मी देवेंद्र शेट्टी फडणवीस. मला शेट्टी नाव लावायला आवडेन असे ते म्हणाले.

    • Devendra Fadanvis : कुर्ला येथे विश्व बंट संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी मी देवेंद्र शेट्टी फडणवीस. मला शेट्टी नाव लावायला आवडेन असे ते म्हणाले.

मुंबई: 'मला देवेंद्र शेट्टी फडणवीस असे नाव लावायला आवडेन. मी बंट समाजाच्या अनेक कार्यक्रमात येत असतो त्यामुळे मला आता शेट्टी समजले जाते. त्यामुळे मला शेट्टी आडनाव लावायला आवडेल. हे नाव लावले तर माझ्या नावावर मुंबईतील दोन-चार हॉटेल तरी नावावर होतील असे मिश्किलपणे देवेंद्र फडणवीस म्हणताच सभागृहात हशा पिकला.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

कुर्ला येथे विश्व बंट संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, बंट समाज हा प्रगत आहे. हा समाज ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी तो मिसळून जातो. महाराष्ट्रात येऊन त्यांनी गोडवा वाढवला आहे. या समाजाच्या अनेक कार्यक्रमात मी आज सहभागी होतो. त्यामुळे मी देखील आता शेट्टी नाव लावतो. या नावामुळेतरी किमान माझ्या नावावर मुंबईतील चार पाच हॉटेल हॉटेल तरी होतील असे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांच्या या व्यक्तव्याने सभागृहात हशा पिकला. पुढे फडणवीस म्हणाले, गोपाळ शेट्टी यांच्यासारखे व्यक्ती राजकारणात यशस्वी झाले आहेत. बंट समाजाचे अतिशय कमी मतदान असतानाही गोपाळ शेट्टी मुंबईतून निवडून येतात. समाजात जे लोक मागे आहेत त्यांना हात देऊन पुढे करण्याचे काम बंट समाजाच्या वतीने होत आहे.

भाजप खासदार गोपाळ शेट्टी यावेळी बोलताना म्हणाले की, "राज्यात दोन ठिकाणी दसरा मेळावा होतो ही चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर मी बोलणार नाही. वेदांत प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांचे भाषण सर्वांनी ऐकावे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या