मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samata Dal : चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस; आंबेडकरांच्या पणतूची घोषणा

Samata Dal : चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस; आंबेडकरांच्या पणतूची घोषणा

Dec 13, 2022, 08:12 AM IST

    • Chandrakant Patil Statement : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर आता शाईफेक करणाऱ्या तरुणाला एक लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे.
Chandrakant Patil Statement (HT)

Chandrakant Patil Statement : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर आता शाईफेक करणाऱ्या तरुणाला एक लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे.

    • Chandrakant Patil Statement : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर आता शाईफेक करणाऱ्या तरुणाला एक लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे.

Rajratna Ambedkar News Today : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये समता दलाच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली होती. त्यामुळं मोठं राजकीय वादंग पेटलं होतं. परंतु आता ज्या तरुणानं चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केली आहे, त्या तरुणाला एक लाखांचा बक्षीस देण्यात येणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतणे राजरत्न आंबेडकर यांनी तशी घोषणा केली असून त्याचा सत्कारही करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्या समता दलाच्या कार्यकर्त्याला आंबेडकरांचे पुतणे राजरत्न आंबेडकर यांच्याकडून एक लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय समता दलाच्या कार्यकर्त्यानं केलेलं कृत्य हे समर्थनीय असून त्याचं कौतुकही राजरत्न आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळं हल्लेखोर तरुणाला बक्षीस जाहीर करण्यात आल्यानंतर हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरमध्ये आयोजित धम्म संमेलनात बोलताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सूर्यासारखे आहेत. त्यांच्यावर कुणी थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी त्याच्याच तोंडावर पडते. असंच वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. परंतु त्यांची थुंकी काळ्या शाईच्या रुपात त्यांच्या तोंडावर पडली, असं म्हणत राजरत्न आंबेडकरांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.

पुढील बातम्या